काळोखात घोणस सापाचा दंश मोठा अनर्थ टळला….

ऋषी सहारे 

   संपादक

    आरमोरी तालुक्यातील मौजा – पालोरा येथे दिनांक २१/०९/२०२४ रोजी सर्पदंशाची घटना घडली आणि परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

         आरमोरी नजीक असलेल्या पालोरा येथील रहिवासी कु.मैथिली भाऊराव धोटे वय -१६ वर्ष हि मध्यरात्री १:०० वाजताच्या सुमारास लघुशंकेकरिता बाहेर येण्याकरीता दरवाजा उघडून बाहेर पाय टाकीत असताना थेट विषारी घोणस सापाच्या शरीरावर पडल्याने विषारी घोणस सापाने तीच्या पायाला जोरदार दंश केला. दंश करताच ती घाबरली आरडाओरड झाल्याने घरचे व घराबाहेरील लोकांनी गर्दी केली.

         साप नेमका कोणता आहे याकरिता आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य करन गिरडकर यांना भ्रमणधवनी वरून संपर्क करण्यात आले.

         घटनेची गंभीरता लक्षात घेऊन करन यांनी तिला प्रथम रुग्णालयात आणा असे सागितले त्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सापाला पकडले. साप हा विषारी घोणस असून त्याचा विष हेमोटॉक्सिक असून रक्तबाधित आहे त्यामुळे रक्तात मिसळल्यास व लवकर उपाय न केल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यासाठी क्षणाचाही विलंब न करता आरमोरी येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सर्पमित्र करन यांनी सापाला सोबत घेऊन गेले.

          उपचार करणाऱ्या डॉक्टरांना दंश केलेला साप विषारी घोणस असल्याचे सांगितले.त्यामुळे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यास मदत झाली आणि पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरु असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.. या कार्याबद्दल वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांनी सर्पमित्र करन गिरडकर व इतरही सर्पमित्र वेळोवेळी अडीअडचणीच्या काळात जीवाची पर्वा न करता आपले कार्य उत्तमरीत्या करीत असल्याने त्याचे कार्य कौतुकास्पदच असल्याची भावना व्यक्त केली आहे…