देशातील सर्वासामान्यातील सर्वसामान्य जनतेला,जर संविधान परिपूर्ण समजले,तरच देशात संविधान क्रांती आजही शक्य….
सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो…
सप्रेम नमस्कार….
सप्रेम जयभिम……
जय जिनेंद्र…..
अस्सलाम वालेकुम….
सत श्री अकाल……
जय सेवालाल…..
जय गुरुदेव…..
जय संविधान……
आपण सर्वजण आपल्यातील खोट्या विद्वानांना ( ज्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वार्थासाठीच केला ) बाजूला सारून..
आपण ज्यांना हृदयातून महापुरुष व महामाता मानतो. ज्यांनी आमच्यासाठी त्याग, संघर्ष व समर्पनातून आम्हाला माणूस बनवून सुखी करण्याचा प्रयत्न केला.त्या महामाता आणि महापुरुषांप्रती आपली आज खरी श्रद्धा जागृत होऊन कृतीतून समर्पित करण्याचा निर्धार करूया..
कारण,आज त्या सर्व महापुरुष व महामाता यांच्यातील आणि आमच्यातील दोघांमध्ये हृदयांचा संबंध येऊ नये म्हणून येथील खोट्या विद्वानांनी जो वैचारिक गोंधळाचा पडदा निर्माण केला आहे,तो फाडून टाकण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे.
या सर्वांनीच अवघडाला सोपे करून सांगण्याऐवजी, सोप्याला अवघड करून सांगण्याला खरी विद्वता आहे,हे समीकरण निर्माण केल्यामुळेच आमच्यात ( सर्वसामान्य जनतेत ) वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे.
त्यासाठी आपल्याला हा पडदा उठविण्यासाठी संविधानातील 395 कोहिनुर हिऱ्यांना समजून घेऊन, जागृत होऊन स्व आणि सामाजिक संरक्षण करण्यासाठी स्वावलंबी होणे,हा एकमेव मार्ग आणि उपाय आहे..
आपण ( भारतीय जनता ) संविधानातून जागृत होऊन सदविचारी कधीही बनूच नये यासाठी व्यवस्थेने आणि राजकारण्यांनी व्यवस्थितीतपणे आपल्यासाठी गेल्या 60 वर्षांपासून व्यवस्था करून ठेवली आहे.
त्यासाठी त्यांनी आपल्याला शिक्षण तर दिले, पण तेही विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी बनू न देण्यासाठी. धार्मिकतेचा अहंकार चढविण्यासाठीच पोषक वातावरण निर्मिती केली. अनितीच्या मार्गाने पैसा मिळवून त्यातून भौतिक विलासाच्या गरजा भागविण्याची स्पर्धा निर्माण करण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न केले.परिणामी “भ्रष्टाचार “म्हणजे आमच्यासाठी ” शिष्टाचार ” झाला..
भ्रष्टाचारातून आलेल्या पैश्याने समाजातील नैतिकता संपवली,वेगवेगळ्या धर्माच्या अंधभक्तांनी राजकारण्यांच्या नादी लागून श्रद्धे ऐवजी कुटनितीला जवळ केले.परिणामी धर्मसंस्थापकांनी निर्माण केलेल्या मूळ तत्वज्ञानाला छेद दिल्या गेला. म्हणून अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांतील गरीब आणि श्रीमंतीची दरी वाढून मानवी हक्काचे उल्लंघन करण्यापर्यंत यांची मिजास पोहचली.
जसजसे गेल्या 60 वर्षात चढत्या आलेखाप्रमाणे वरील परिस्थिती वाढत गेली तसतशी संविधान आणि लोकशाही मूल्ये अदृष्य होत गेली.जातीच्या विषारी अहंकारी भेदाने आर्थिक विषमता निर्माण केली. त्यामुळे आमच्या देशात कुसांस्कृतिक मानसिक गुलामीला एक राजकीय वलय निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत अराजकता निर्माण करण्यात व्यवस्थेला यश आले आहे.म्हणूनच आमच्यावर महागाईचे,बेरोजगारीचे,अत्याचाराचे,अन्यायाचे,बलात्काराचे कितीही तोंड दाबून बुक्क्याचे मार दिले,तरी ही हुं की चुं करणार नाही,ही आमची गुलामीची मानसिकता,ही त्यांची संपत्ती ठरली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या 150 वर्षात आम्ही केवळ उद्या उगवणाऱ्या आशेच्या सूर्यकीरणावर जगत आहोत. परंतू ,तो सूर्य अजून तरी उगवलेला अनुभवास मिळाला नाही.ज्याची किरणे एका पिढीपुरती तरी असतील..
कारण ,स्वातंत्र्यापूर्वीच्या 150 वर्षात आमच्यावर इंग्रज आणि मोगलांनी अत्याचार केले.शिवाय येथील पेशवाईने बहुजनासहित सर्वांनाच चातुरवर्णाचे चटके दिले.1857 च्या भटपांड्याच्या बंडामुळे इंग्रजांचा राजकीय जम बसला.जालीयनवाला बाग हत्याकांड,गांधीजींच्या असहकार चळवळीमुळे इंग्रजानी केलेली धरपकड असेल,नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आझाद हिंद फौजेची निर्मिती असेल,एकंदरीत स्वातंत्र्यापूर्वीची 150 वर्षे म्हणजे सुद्धा देशाचा रक्तरंजित पाटचाच इतिहास होता.स्वातंत्र्यानंतरचा इतिहास सुद्धा रक्तरंजित पाट वाहणाराच ठरला.यामध्ये सुरुवातीची कांही 10 वर्षे सोडली तर 1962,1965,1971 मध्ये चीन,पाकिस्तान सोबतचे युद्ध म्हणजे काय सिद्ध करते?
त्याचप्रमाणे देशांतर्गत,नक्षलवाद,पाकिस्तानच्या छुप्या अतिरेकी कारवाया,संसदेवरील हल्ला,खलिस्तानवादातून अमृतसरच्या सुवर्णमंदिरात घडलेले ब्लु स्टार ऑपरेशन, भोपाळ वायुकांड,कारगिल युद्ध, कंदाहार विमान अपहरण,जागतिक आर्थिक मंदी,रुपयाचे डॉलर सोबतचे अवमूल्यन,आता पाकिस्तान,बांगलादेश,श्रीलंका मधील अराजकता यांचा दुरगामी आमच्यावर होणारा परिणाम दरवर्षीचे केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांचे भ्रष्टाचारामुळे वाढणारे तुटीचे अर्थसंकल्प,त्यातून देश व सर्वच राज्ये कर्जबाजारी होण्याची स्पर्धा, या व अशा अनेक कारणामुळे भारतीय जनतेचे कमी होणारे आरोग्य वयोमान,ही देशाला मिळालेली धोक्याची घंटा आहे!
असे जीवन आमचे ( भारतीय जनतेचे ) गेल्या 210 वर्षात का झाले….? याचा विचार आम्ही करणार का नाही?
या लेखाचा उर्वरित उत्तरार्ध उद्याच्या भागात…..
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरक,7875452689..