आज पासून ‘त्रिकालनेत्र’ कलर PDF स्वरूपात!.. आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते विमोचन…

 

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज –

         डिजीटल युगात कलर PDF वृत्तपत्राचे क्रेज वाढल्याने ‘त्रिकालनेत्र’ वृत्तपत्रानेही एकपाऊल पुढे टाकत आजपासून कलर PDF ची सुरूवात केली. या कलर PDF चे विमोचन श्री गणेश उत्सव पर्वावर आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आ. कृष्णाभाऊ गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

         गडचिरोली या आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, उद्योगविरहीत जिल्ह्यात नियमीत व अखंडीत प्रकाशित होणारे ‘त्रिकालनेत्र’ वृत्तपत्राने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवून वाचकांचे विश्वास संपादन केले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अश्या सर्वच स्तरातील बातम्यांना ‘त्रिकालनेत्र’ नेहमीच अग्रस्थान दिलेले असून ‘त्रिकालनेत्र’ अखंडीतपणे प्रकाशित होत आहे. मात्र प्रकाशित होणारे वृत्तपत्र ब्लैक ॲन्ड व्हाईट असले तरी सोशल मिडीयावर व्हाट्सअप, फेसबुक, इन्ट्राग्रॅमवर कलर PDF स्वरूपात प्रसारीत व्हावे अशी वाचकांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेत अखेर त्रिकालनेत्र परिवारातर्फे दि. २४ सप्टेंबर २०२३ ला कलर PDF चे विमोचन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते करून वाचकांच्या सेवेत सादर केले.

         यावेळी न.प.चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पदम कपडा बाजारचे संचालक संतोषकुमार शामदासानी, संगम फॅशन मॉलचे संचालक लक्ष्मण रामाणी, शेतकरी कृषी केंद्रचे संचालक तथा माजी नगरसेवक गणेश फाफट, संपादक प्रकाश दुबे, प्रेस क्लब सचिव राजरतन मेश्राम, नाकाडे कृषी केंद्र चे संचालक भास्कर नाकाडे, राहुल कृषी केंद्रचे संचालक विठ्ठल नागापुरे, व्हाईस ऑफ मिडीया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुइमवार, सचिव कैलास शर्मा, हरिश दुबे, पंकज चहांदे, गोलु ठेंगरी आदी उपस्थित होते.

      त्रिकालनेत्र च्या कलर PDF ला आ. गजबे व उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. संचालन प्रकाश दुबे यांनी केले तर आभार हरिश दुबे यांनी मानले.