असदपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीची शाखा स्थापन…

 

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

        अचलपूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेल्या असदपूर येथे माजी खासदार प्रा जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ग्राम शाखा स्थापन करण्यात आली.

          दिनांक 23 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी 3वाजता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली तथा जिल्हा उपाध्यक्ष जानराव वाटाणे यांच्या अध्यक्षतेखाली व नवनियुक्त जिल्हा सचिव प्रमोदराव नितनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक बुद्ध विहारांमध्ये घेण्यात आलेल्या बैठकी प्रसंगी वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी महान संघर्षमय त्यागी नेतृत्व असलेल्या जगप्रसिद्ध लॉंगमार्चचे प्रणेते जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पीपल्स रिपब्लिकन पार्टीत काम करण्याची इच्छा प्रदर्शित करून त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रवेश केला. त्या सर्वांना सन्मानपूर्वक पक्षात सहभागी करून घेत स्थापन करण्यात आलेल्या पक्षाच्या ग्रामशाखेत त्यांना सामावून घेण्यात आले.

           गठीत करण्यात आलेल्या खालील प्रमाणे शाखेतील पंजाबराव नितनवरे शाखाध्यक्ष, सुनील नितनवरे उपाध्यक्ष, जगजीवन नितनवरे सचिव, आशिष नितनवरे सहसचिव, धर्मा नितनवरे कोषाध्यक्ष, रवी ढोके सह कोषाअध्यक्ष, गोरखनाथ नितनवरे मुख्य मार्गदर्शक, गजानन वाघमारे संपर्कप्रमुख, इरफान शहा सदस्य ,रवी वाघमारे सदस्य, अमोल नितनवरे सदस्य, अशोक नितनवरे सदस्य विनोद नितनवरे सदस्य, विलास नितनवरे सदस्य, आशाबाई नितनवरे सदस्य लिलाबाई नितनवरे सदस्य यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हा कार्यकारणीवर सचिव पदी घेण्यात आलेल्या प्रमोद हरिचंद्र नितनवरे व अचलपूर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्त केल्या गेलेले कैलास भीमराव पाखरे या सर्वांना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्या हस्ते अधिकृतपणे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

       यावेळी सर्व नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांनी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांचा त्यागमय वारसा तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.