ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी-

     गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी हे सर्वात मोठी बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण आहे. मागील अनेक वर्षापासून आरमोरी शहराला तसेच तालुक्यातील खेडेगाव यांना विजेच्या समस्येने ग्रासले आहे. थोडा जरी पाऊस आला तरी शहरातील वीजपुरवठा खंडित होतो. आता गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे आहे, काही दिवसात नवरात्रोत्सव सुरू होईल अश्या सणासुदीच्या दिवसात शहरात विजेची समस्या उद्भवू नये ;यासाठी आरमोरी शहरातील काही भाग जसे की, शेगाव टोली, काळागोटा, बर्डी वरील काही भाग आणि शहर विभागातील काही भाग ग्रामीण फिडर वर टाकलेला आहे. तो भाग त्वरित शहर विभागातील फिडरवर टाकण्यात यावे. तसेच शहरातील आणि तालुक्यातील विजेची समस्या त्वरित निकाली काढावी अशी मागणी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.

     तसेच आरमोरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मान. श्री कृष्णा भाऊ गजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी शहरात लवकरात लवकर 132kv क्षमतेचा नवीन विजकेंद्र स्थापित करण्यात यावा. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही लकरात लवकर करावी अशी मागणी पंकज भाऊ खरवडे यांच्या तर्फे वीजवितरण कंपनीच्या अधिकारी इंजिनियर वैद्य साहेब आणि इंजिनीयर पानबुळे साहेब यांना निवेदना व्दारे करण्यात आली.

   यावेळी भा.ज.यु. मोर्चा चे अमोल खेडकर, जितेंद्र ठाकरे, रुपेश पुणेकर, संजय सोनटक्के, गोविंदा भोयर, हितेश कोपुलवार, प्रसाद साळवे, विवेक रोडगे, स्वप्नील शेंडे आणि वीजवितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com