उपसंपादक/अशोक खंडारे

 

 महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी गडचिरोली यांच्या निर्देशानुसार नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करिता परिसंवाद आयोजित करण्यात आला होता

. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे प्राचार्य शैलेंद्र खराती हे होते तर प्रमुख मार्गदर्शक आष्टी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, प्राध्यापक डॉक्टर राज मुसणे, गट साधन केंद्र चामोर्शी येथील यामसानी मामीडवार, अंक्लेश रोहनकर,आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या विविध वाटचाली व प्रवेशासंदर्भात व उपलब्ध असलेल्या कोर्सेस ची माहिती अवगत करून दिली. 

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक के. जी. बैस, प्राध्यापक राजकुमार ठवरे,व सर्व प्राध्यापक तथा सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन प्राध्यापक रवींद्र इंगोले तर आभार प्रदर्शन वर्षा दोशेटवार यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com