चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:-
कृष्णमूरारी कटकवार विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेनंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या सदस्य विद्यार्थ्यांनी विविध वृक्षप्रजातीची वृक्षरोपे जुलै आगस्ट महिन्यात तयार केले.जवळपास 100 वृक्षरोपे पाच विद्यार्थ्यांनी तयार केले असून या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार संस्थासदस्य विशाल कटकवार व संस्थाअध्यक्ष विद्या कटकवार,प्राचार्य रामकृष्ण हारगुडे व ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांचे हस्ते करण्यात आला. याच कार्यक्रमात गणेशोत्सवात इकोफ्रेंडली व पर्यावरणस्नेही देखाव्यासहित गणेश मूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.वृक्षरोपे तयार करणारे विद्यार्थी पूर्वा बहेकार,रुणाली निंबेकर, रोहिणी भैसारे, प्रित गजभिये व अथर्व बहेकार यांनी यापुढेही अधिकाधिक वृक्षरोपे तयार करण्याचा संकल्प केलेला आहे.
पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करणारे विद्यार्थी यामध्ये हायस्कूल गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारी पूर्वा बहेकार,द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी रुणाली निंबेकर, तृतीय क्रमांक प्राप्त करणारी रोहिणी भैसारे व निधी बनकर यांचा तसेच मिडलस्कुल गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा नैतिक बनकर,द्वितीय क्रमांक प्राप्त करणारा अथर्व बहेकार तसेच तृतीय क्रमांक प्राप्त करणारा हिमांशू बनकर यांचा सत्कार संस्थासदस्य विशाल कटकवार व संस्थाध्यक्ष विद्या कटकवार,प्राचार्य रामकृष्ण हारगुडे व ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांचे हस्ते करण्यात आला.या विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीसोबत आकर्षक पर्यावरणसंदेश देणारा देखावा सुद्धा तयार केला त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.जागेश्वर तिडके,पुष्पा बोरकर,बी. एस. लंजे,संजय भेंडारकर,प्रा.शीतल साहू व इतर प्राध्यापक-शिक्षकवृंद, कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले