पारशिवनी:- ( सं) तालुक्यात आज लम्पी चर्म रोगाचे ग्रासित नविन१६ पशु रुग्ण आढकुन आले असुन तालुक्यात एकुण संख्या २५ जनावरांमध्ये लम्पी रोगाचे चिन्ह आढळून आले आहेत.
लम्पी आजाराचा विळखा आता घट्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे.काही जनावरे लम्पीसदृश आजाराने बाधित असल्याचे आढळून आली आहेत.
आता पर्यंत पारशिवनी तालुक्यातील साटक गावात नऊ व बखारी गावात दोन,कान्हादेवी टेकाडी येथे तीन बैल,व काद्री येथे ६ सहा व महादुला गावांत ५ पाच पशुना लंम्पीचे लक्षणे दिसून आली.
सध्या स्थित लम्पी आजाराची तालुकात २५ जनावरे आढळून आली असल्याने प्रशासनाने खबरदारी उपाय सुरू केले आहेत.
बाधित जनावरे मिळालेल्या भागातील शुक्रवार पर्यत ८ हजार ५०० गाई व बैलाचे लशीकरण करण्यात आले.शुक्रवारी पर्यत १ हजार ८०० गाई बैलांच्या कोठ्यांची फवारणी करण्यात आली आहे.
आज कन्हान विभागातील काद्री व दहेगाव जोशी विभागातील निबा व महादुला येथे लशिकरण करण्यात येणार आहे. नवीन लम्पी सदृश्य जणावरांचे संपल तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
आज दहेगाव जोशी पशु चिकित्सा केन्द्रा अंतर्गत निबा महादुला येथे तर कन्हान पशु चिकित्सा केन्द्रा अंतर्गत कांद्री या गावात गोठ्यांची फवारणी करणार आहेत.तद्वतच जणावरांची तपासणी करून लशीकरण करण्यात येणार असल्याची माहीती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ठाकुर,दहेगाव केंद्राचे डॉ. कुबडे,कन्हान केंद्राच्या डॉ. प्रिती वाळके यांनी दिली.