ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
न्यायालयाच्या निर्णय विरोधात विविध संघटनांचे बुधवार २१ ऑगस्ट या भारत बंद मोहिमेला साकोली बंद ९०% टक्के यशस्वी होण्यासाठी विविध संघटनांनी शहरात मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. जूने पंचायत समिती गांधी चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
बिरसा फाइटर चे सुरेश पंधरे, ऑल इंडिया पीपल फेडरेशनचे केशव भलावी, बि डी खांडवाये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, भारतीय बौद्ध महासभेचे साकोली अध्यक्ष विलास मेश्राम, समता सैनिक दलाचे साकोली कमांडर कैलास गेडाम, बहुजन समाज पार्टीचे मनोज कोटांगले बिट्टू गजभिये, तालुका स्मारक समितीचे दीपक साखरे ,अशोक रंगारी, सोशल फोरमचे दादू बडोले मूलनिवासी संघटनेचे शब्बीर पठाण, काँग्रेसचे दिलीप मासुरकर, बामसेफचे कागदराव रंगारी, कार्तिक मेश्राम, माजी सभापती रेखा वासनिक, माजी सभापती धनपाल उंदिरवांडे, सामाजिक कार्यकर्ते चूनीलाल वासनिक, जगदीश रंगारी, नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष जगन उईके, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली काढून सभा संपन्न झाली.
याप्रसंगी मनोज कोठांगले प्रदीप मासुरकर कैलास गेडाम विलास मेश्राम अशोक रंगारी, दादू बडोले व इतर मान्यवरांची सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जो निर्णय देण्यात आलेला आहे व तो कसा घटनाबाह्य आहे व आरक्षण ची काळ गरज आहे याविषयी आपल्या भाषणातून पटवून दिले.
याप्रसंगी साकोली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस, वाहतूक पोलीस व महिला पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाने ०१ ऑगस्टच्या निर्णयावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग निर्माण व क्रिमिलियरची शर्त लागू करण्यात आली.
या निर्णयामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना मिळणा-या आरक्षणाला नुकसान होऊ शकतो. या विचारधारेतून होकाराची भावना ठेवणा-या संघटनेकडून साकोली शहर बंद करण्याचा निर्णय सर्व सामाजिक संघटनांनी घेतला. सर्व व्यापारी प्रतिष्ठान पूर्ण बंद ठेवण्यात आले.
सर्व संघटनांच्या “भारत बंद.. साकोली बंद” ला व्यापारी बंधू, इतर प्रतिष्ठाने, शाळा कॉलेज, महाविद्यालय यांनी पूर्ण समर्थन देत कडकडीत बंद पाळण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती, आदिवासी मुळनिवासी, नॅशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन संघटना, कौमी एकता मंच, प्रबोधनकार कला साहित्य समिती, पंचशील महिला मंडळ, समता सैनिक दल, महामाया समिती, सावित्रीबाई महिला मंडळ, , बहुजन समाज पार्टी, बामसेफ संघटना, विविध सामाजिक संघटन, राजकीय पक्ष, बुद्धिजीवी वर्ग तथा समस्त नागरिकांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.
सदर मोर्चा स. ११ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथून प्रारंभ होत नागझिरा चौक, प्रगती कॉलनी चौक, बसस्थानक चौक, नगरपरिषद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न्यायालय गोवर्धन चौक, लाखांदूर रोड ते जूने पंचायत समिती राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकात सभा आयोजित करून मोर्चा संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रबोधनकारकला साहित्य संघटनेचे अध्यक्ष भावेश कोठांगले यांनी केले तर आभार तालुका स्मारक समितीचे व्यवस्थापक सोनू राऊत यांनी मानले
सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे यांना निवेदन देण्यात आले. शहरात भारत बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक सुशांतकुमार सिंह व पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नायक, पोलीस शिपाई, महिला पोलीस व वाहतुक पोलीस यांचा सकाळपासूनच शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केलेला होता. यात साकोलीकरांकडून भारत बंद साकोली बंद ९०% टक्के यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले