डाॅ.शिलु चिमुरकरांच्या नेतृत्वात देसाईगंज येथे धरणे आंदोलन… — पंधराशे रुपये परत घ्या,महिलांना सुरक्षा देण्याची केली मागणी…

      पंकज चहांदे

देसाईगंज/वडसा प्रतिनिधि

        दखल न्यूज भारत

देसाईगंज :- मागील १३ ऑगस्ट पासुन देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात महिलांवर अत्याचार होत आहेत. मात्र आरोपिंना शोधुन कठोर शिक्षा देण्यास व बलात्कारासारख्या घटना रोखण्यास सत्ताधारी सपशेल अपयशी ठरत आहेत.

         ही अतिशय गंभीर बाब लक्षात घेता राज्य शासनाने महिलांना देऊ केलेले पंधराशे रुपये परत घ्या पण महिलांना सुरक्षा देण्याच्या मागणीला घेऊन सत्ताधारी राज्य शासनाचा जाहिर निषेध करत देसाईगंज येथील फवारा चौकात डाॅ.शिलु चिमुरकरांच्या नेतृत्वात तालुका महिला काँग्रेसच्या वतीने धरणे निषेध आंदोलन करण्यात आले.

      यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचेअध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष पुष्पाताई कोहपरे,गिता नाकाडे, वैष्णवी आकरे, युवा नेता पिंकुभाऊ बावने, युवा नेता लिलाधरजी भर्रे, सेवादल शहराध्यक्ष भिमराव नगराळे, ओबीसी तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे, विजय पिल्लेवान, महादेव कुंभरे, शेतकरी नेते श्याम मस्के, मनोज ढोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मेश्राम, राजकुमार मेश्राम, हरीराम नाकाडे, रवी भिलकर, पुजा ढवळे, संदीप प्रधान, नरेश लिंगायत, राहुल उइके, देवका शेंडे, विमल गुरूनुले, वच्छला नाकाडे, ज्योती हातझाडे, गंगाबाई डोंगरवार, लता डोंगरवार, चंद्रकला मडावी आदी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     दरम्यान बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर व नागरिक येथील एका तरुणीवर तसेच आरमोरी येथील एका मुलिवर झालेल्या लैंगिक अत्याचारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महिलांवर सातत्याने होत असलेले अन्याय अत्याचार रोखण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, यथाशिघ्र फास्टट्रक न्यायालयात सुनावणी करून आरोपिंना फाशी देण्यात यावी, तसेच यापुढे महिलांवर अन्याय, अत्याचार होणार नाहीत यासाठी ठोस उपाययोना करून आरोपिंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करणांवरही गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

           तथापी महिला संरक्षणासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करून प्रत्येक शाळेच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची सक्ती करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.