राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा..
बदलापूर येथे शाळेतील चिमूकली विद्यार्थिनीचा लैंगिक शोषणाच्या निषेर्धात व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी,तसेच घटनेची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा याकरीता आज महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने काळ्या फीती लावत स्थानिक सागर चौकात निदर्शने करण्यात आले.
तद्वतच शासनाचा विरोधात नारेबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला.
राज्यात बदलापूर नंतरही ठिकठिकाणी महिला तसेच लहान बालकावर अत्याचाराचा घटणा प्रकाशात येत आहेत.कायदा व सूव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.मात्र यूती प्रणीत राज्य शासन स्वताचीच पाठ थोपविण्यात मग्न आहे.
कायदा व सूव्यवस्था बिघडण्याची नैतिक जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची आहे.त्यानी महिलावर अत्याचाराचा सत्राची नैतिक जबाबदारी घेत तात्काळ राजीनामा द्यावा याकरीता त्यांचा विरोधात महाविकास आघाडीकडून प्रचंड नारेबाजी करीत,निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल,कांग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, माजी नगराध्यक्ष डॉ.महेन्द्र कुमार मोहबंसी,शिवसेना उबाठा ता.प्रमूख आशीष काळे,नगराध्यक्ष अनीताताई बोरकर,कांग्रेस महिला ता.अध्यक्ष आशाताई तूलावी,नगरपंचायत सभापती अशोक कंगाले,हेमलता नंदेश्वर, नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल,कांताबाई मठ्ठे ,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तूलावी, माजी प.स.सभापती गिरीधर तितराम,माजी नगरसेवक उसमान खान,पुडलीक देशमुख,मनोज सिडाम,सोनू भट्टड,विजय पूस्तोडे,घिसू पाटील खूणे,आसिफ शेख,दशरथ लाडे,अयूब पठान,भावेश मुंगणकर,वैभव बंसोड,अशपाक खान,प्रविण खडसे,तूळशिराम बूरबांधे,पूरुषोत्तम तिरगम,अज्जू सय्यद,राकेश चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थीत होते.