आळंदीत मविआच्या वतीने काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध….

दिनेश कुऱ्हाडे 

उपसंपादक

             आळंदी बदलापूर प्रकरणात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर मविआने हा बंद मागे घेतला आहे. मात्र राज्यभर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.

           त्यामुळे सर्वत्र मुक आंदोलन आणि काळ्या फिती लावून झालेल्या घटनेचा आणि सरकारचा निषेध केला जाणार आहे. यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे सहभागी होणार आहेत.

            बंद नाही तर निषेध सुरू ठेवण्याचा निर्णय यातून मविआने घेतला आहे. याच अनुषंगाने तिर्थक्षेत्र आळंदीत मविआच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे काळ्या फिती बांधून निषेध मुक आंदोलन करण्यात आले.

               यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उत्तम गोगावले, नंदकुमार वडगावकर, विलास कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, आशिष गोगावले, अनिकेत डफळ, तुषार तापकीर, शशिराजे जाधव, निखिल तापकीर, संजय वडगावकर, सतिष कुऱ्हाडे, मंगेश तिताडे, मनोज पवार, अनिता झुजम, लता वरतले, शुभांगी यादव, चारुशिला पोटफोडे, अनिता शिंदे, कल्याणी मालप, सविता कांबळे तसेच मविआचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.