चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र विभाग आणि आजीवन अध्यसन विस्तार केंद्राच्या वतीने समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आज 24 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी 11 वाजता कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश -१ व सत्र न्यायाधिश भंडारा मनिष गणोरकर, सचिव विधी सेवा प्राधिकरण भंडारा बिजु बा. गवारे, अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता संघ भंडारा, ॲड. प्रभातकुमार श्यामसुंदर मिश्रा, मुख्य विधी संरक्षणअधिवक्ता, भंडारा ॲड. भारत भि. गभणे, ॲड. प्रमोद आठवले, गिरी, संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, प्रा. लालचंद मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वाईट प्रवृत्तीचे लोक यांच्यापासून विशिष्ट प्रकारे अंतर ठेवून आपण वावरणे आवश्यक आहे. समाजात वावरत असताना सर्वच माणसे चांगली असतात असे नसते, उदाहरणार्थ., गाडी चालवतो गाडी चालवत असताना दुसऱ्या गाडीला टक्कर होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.
यासाठी कायदे तयार केलेले आहेत. आपण कायद्यात वागतो आणि कायद्याचे पालन करतो यासाठी नियम, कायदे तयार केलेले आहेत. यासाठी प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. दुष्प्रवृत्ती पासून स्वरक्षण ही काळाची गरज झालेली आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश -१ व सत्र न्यायाधिश भंडारा मनिष गणोरकर कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
या कार्यशाळेदरम्यान आंतरराष्ट्रीय युवा दिन याविषयावर मार्गदर्शन म्हणून मुख्य विधी संरक्षण अधिवक्ता, भंडारा ॲड. भारत गभणे, स्त्री भृण हत्या व PCPNDT वर माहिती अध्यक्ष जिल्हा अधिवक्ता संघ भंडारा ॲड. प्रभातकुमार श्यामसुंदर मिश्रा, महाराष्ट्र रॅगींग करण्यास मनाई अधिनियम १९९९ वर मागदर्शन ॲड. प्रमोद आठवले, मोटार वाहन अधिनियम २०१९ वर मागदर्शन मडामे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
तर विधी सेवा प्राधिकरणबाबत सचिव विधी सेवा प्राधिकरण भंडारा बिजु बा. गवारे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला डॉ. धनंजय गभने, डॉ. बंडू चौधरी, डॉ. सुनंदा देशपांडे, डॉ. रामभाऊ कोटांगले, डॉ. सुरेश बंसपाल, डॉ. संदीप कुमार सरैया, डॉ.संगीता हाडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर, संचालन प्रा. युवराज जांभुळकर तर आभार लालचंद मेश्राम यांनी मानले.