दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
मराठी व हिंदी कवी बोली लेखक हिरामण लांजे (रमानंद) यांच्या अभिव्यक्ती,साहित्य आणि समाज या ग्रंथाचे प्रकाशन,”विवेक प्रकाशन नागपुर आणि स्मार्ट व्हिलेज सोसायटी साकोली,यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोज रविवारला दुपारी चार वाजता प्रकाशपर्व साकोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळ अध्यक्ष डॉ.हरिश्चंद्र बोरकर,डॉ.नीलकांत कुलसंगे,डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे,डॉ.राजन जयस्वाल,ॲड.लखनसिंग कटरे, डॉ.तीर्थराज कापगते यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ओमप्रकाश शिव,प्रदीप पवार,जगदीश बारसागडे यांच्या सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश बाळबुद्धे,ॲड. अण्णा परशुरामकर आणि विवेक प्रकाशन नागपूरचे सुशीला लांजे, डॉ.विजया लांजे यांनी केले आहे.