ऋषी सहारे
संपादक
आरमोरी –
तालुक्यातील जोगीसाखरा परिसरात वाघाचे पाऊल खुणा पाहून वाघ फिरत असल्याने वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नुकताच कासवी येथील इसमाला गंभीर जख्मी केल्याने दहशत पसरली होती त्यातच आता जोगिसाखरा नर्सरी इथ पाऊल खुणा सकाळी मिळाल्याने भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.
कासवी येथील इसमाला टय्या नावाच्या वाघाने गंभीर जख्मी केले तर आज दि.२४ रोज गुरुवारला सकाळी चौकीदार नर्सरी त मुख्य द्वार खोलताच वाघाचे पाऊल खुणा दिसल्या तो वाघ टी2 असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी म्हटले आहे.
तरी परिसरातील शेतकरी व जनतेने सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.