दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : ‘चांद्रयान मोहिमेचे भारताचे यश प्रत्येक भारतीय नागरिकाला अतुलनीय असून प्रगत देशांच्या श्रेणीत भारत जाऊन बसला आहे. भारताचे शास्त्रज्ञ, इस्त्रो सारख्या संस्था आणि पं.नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांना हे श्रेय जाते. एक भारतीय म्हणून सर्वांना हा अभिमानाचा क्षण आहे.
अनेक दशकांची मेहनत, संशोधन फळास आले आहे. विज्ञान आणि संशोधनाला या यशामुळे प्रेरणा मिळेल. शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान – तंत्रज्ञान – संशोधनाला प्राधान्य देणे सर्वांगीण प्रगतीसाठी हितकारक ठरेल’, अशी प्रतिक्रिया वैभवी मल्टीस्पेशालिटीचे चेअरमन डॉ.सुनिल वाघमारे यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
कोट्यवधी लोक इस्रोला धन्यवाद देत आहेत. आम्हाला अभिमान वाटवा असे काम तुम्ही केले आहे. भारताने इतिहास रचत असताना पाहायला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानतो. भारत चंद्रावर आहे. आम्ही चंद्रावर आहोत असे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.