लाडकी बहिन व लाडका भाऊ या योजना संविधानाच्या विसंगत विषमता निर्माण करणाऱ्या…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज :- विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारने योजनाचा धडाका लावला आहे तर विरोधी पक्षाने सुद्धा या योजनेत हात धूवून घेण्याचा सपाटा लावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी टेबल लावून लाडकी बहिन योजनेचे फार्म भरून घेत आहेत तर विरोधी पक्षाच्या जिल्हा पदाधिका-यानी या योजनेचे श्रेय घेण्यासाठी लाडकी बहिन योजनेचे फार्म भरवून घेण्यासाठी सर्व तालुकाध्यक्षांना आदेश दिल्याचे संदेश सोशल मिडीयात फिरत आहेत यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी जोरदार टिका केली आहे व या योजना स़विधानातील समतेच्या विसंगत महिला-पुरूषात विषमता निर्माणकरणाऱ्या असल्याचे म्हटले आहे.

       या संदर्भात प्रतिक्रीया देतांना बाळू टेंभुर्णे म्हणाले की, लाडकी बहिन योजनेत पंधराशे तर लाडका भाऊ योजनेेत सहा हजार, आठ हजार, दहा हजार ही विषमता कशासाठी? बारावी पास, पदवीधर व पदव्युत्तर मुली नाही आहेत कां? मग मुलींना या योजनेचा लाभ न देता केवळ मुलांनाच कां? यावरून हे सिद्ध होते की, भाजप प्रणीत महायुती व कॉंग्रेस सहित महाविकास आघाडीतील सर्व पक्ष हे संविधानातील समतेच्या विसंगत असून मनुस्मृतीतील विषमता मानणारे आहेत. म्हणून बहिन भावात दुजाभाव केल्याचे दिसते या विसंगत कृतीचा आम्ही निषेध करतो असेही बाळू टेंभुर्णे यांनी म्हटले आहे.

        बहिन भावात, महिला – पुरूषात भेदाभेद न करता समानतेच्या तत्वावर योजना राबविल्या गेल्या पाहिजेत, महिलांना कमी लेखने हि विषमताच आहे, म्हणून बिजेपी – कॉंग्रेसने विषमतेचे राजकारण बंद केले पाहिजे. लाडक्या भावा प्रमाणे बहिनीला सुध्दा सहा हजार मिळाले पाहिजे असेही टेंभुर्णे यांनी म्हटले आहे.