आजचे राजकारणी हे साम, दाम, दंड आणि भेदाच्या कुटनीतीवर तयार झालेले अहेत, या नितीची जननी मनुस्मृती व्हाया आर्यचाणक्यातून विकसित झालेली आहे. या सर्वाना बाहेरून आलेले आर्य म्हणजे आताचे ब्राम्हण्यग्रस्त जबाबदार आहेत.
परंतू,राज्यशास्त्रातील राजकीय सिद्धांत हे सदसदविवेक बुद्धीतून विकसित झालेले आहे. सॉक्रेटीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या राजकीय सिध्दांतातून राजकीय नेते लोकशाहीत अपेक्षित होते.ज्याची जननी तथागत भगवान बुद्धाच्या धम्मातून अधोरेखित झालेली आहे.शिवाय धम्माचे तत्वज्ञान हे संपूर्णता निसर्गनियमावर आधारित आहे.
हा फरक या दोन तत्वज्ञात परस्पर विरोधी असल्यामुळे आजच्या राजकारण्यांनी (सर्वच पक्षातील सर्वच नेते,याला काही बोटावर मोजण्याइतके नेते अपवाद असतीलही परंतू,त्यांचा प्रभाव इथे जाणवत नाही) चेहरा राजकीय सिद्धांताचा वापरला कृती मात्र कुटनीची ठेवली!
त्यामुळे विवेकवादावर निर्माण झालेले संविधान आणि लोकशाही यांना या राजकारण्यांच्या तावडीतून सोडविण्याचा विडा आपल्याला उचलावा लागेल….
म्हणूनच संविधान जागृती देशाची प्रगती याशिवाय अन्य मार्ग किंवा पर्याय नाही.म्हणून तुमच्यातील त्या हृदयातील जागृत सदसदविवेक बुद्धीला हे आव्हान आहे…..
आज आम्ही प्रत्येकजन आमच्या कुटुंबाचा विचार करूनच जगत आलोय,आहोत आणि राहू. परंतू,आमच्यावर जी कुटुंबाची जबाबदारी आहे.तिला पार पाडता,पाडता आमच्या नाकेनवू येतात.पण तरी सुद्धा आम्ही या जबाबदाऱ्या पार पाडत,पाडतच एक दिवस संपतो………
परंतू,आम्ही असा कधीतरी उलट आमच्या मेंदूला प्रश्न कधी विचारतो का, की माझी काहीही चूक नसतानाही माझ्यावर महागाई, बेरोजगारी, उद्याच्या भविष्यात अंधार असलेली,युवापिढी भरकटलेली, अशी वेळ का आली? याला कोण जबाबदार?
स्वातंत्र्यापूर्वीची तरी परिस्थिती चांगली वाटावी अशी वेळ आमच्यावर का आली?
हे व असे अनेक कितीतरी प्रकारचे प्रश्न कधीतरी आमच्या बुद्धीला विचारतो का?
अर्थात नाहीच….
कारण येथील व्यवस्थेने चेहरा संविधानाचा वापरला आणि कृती मात्र कुटनीतीची केली.म्हणून आम्ही सदविचारी बनू शकलो नाही.यांनी चेहरा लोकशाहीचा वापरला कृती मात्र ठोकशाहीची केली.त्यामुळे आम्ही यांच्या कृत्रिम व्यवस्थेचे गुलाम होऊन बसल्यामुळे आमच्या उद्याच्या भविष्यात अंधार दिसत आहे….!
आम्ही (देशाच्या व राज्याच्या आणि आमच्या सुद्धा) आर्थिक विकासाच्या गप्पा मारतो.आमच्याकडे भरपूर संपती असल्याचा आव आणतो. आम्हाला कोणतीच अडचण नाही असा आव आणतो..
परंतू,पहिल्या लॉकडाऊनच्या अडीच महिन्याच्या काळात संपूर्ण देशाचा आर्थिक गाडा पूर्णपणे थांबलेला होता..
तेंव्हा केंद्रसरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला म्हणून याच मोदी -शहाने RBI च्या राखीव निधीतून जबरदस्तीने 1,71000 कोटी रुपये घेतले…..
त्याच पैश्यातून स्वतःचे मानधन खासदारांनी 40,000/- प्रत्येकी वाढवून घेतले….!
भाजपविरोधी राज्यसरकारांना जी.एस.टी.चे पॆसे सुद्धा त्यावेळी वेळेवर केंद्र सरकारने दिले नाहीत.
त्यावेळी केंद्र सरकारने परदेशातून नागरिकांना आपल्या विमानाने मायदेशी आणण्याची सुविधा केली.
परंतू,येथील सामान्य जनता जी केवळ पोट भरण्यासाठी इतर राज्यात मुलाबाळासहीत कामाला जाते. अशा हजारो कामगारांना त्यांच्या घरी जाण्याची सुविधा केली नव्हती.म्हणून लोकं शेकडो मैल पायी चालून घरे गाठली,कुणी रस्त्यातच जीवे गमविले….!
मग हा देश केवळ श्रीमंतांचाच आहे का?
या देशात गरिबांनी केवळ अदानी अंबानीची श्रीमंती वाढविण्यासाठीच जगायचे का…?
हे प्रश्न आम्हाला कधीतरी पडणार का नाहीत…?
आम्ही ( देश, राज्य आणि आपण ) जर खरोखर श्रीमंत असतो तर त्या अडीच महिन्यात आमचा देश व राज्य आणि घरे चालविण्यासाठी आमची बचत कुठे गेली होती?
गेल्या 70 वर्षात ( आमचे केंद्रसरकार,राज्यसरकारे आणि आम्ही जर केवळ अडीच महिने दुसऱ्याच्या मदतीवर किंवा कर्जावर अवलंबून असू तर,आम्ही,आमचे केंद्रसरकार,राज्य सरकारे हे सर्वजण खोट्या आर्थिक विकासाच्या पोकळ फुगवट्यावर चालत आहे.हा फुगा फुगून फुगून कधीही फुटू शकतो. याची टांगती तलवार केवळ सामान्य जनतेवर म्हणजे आमच्यावर आहे…!
ही टांगती तलवार जर नष्ट करायची असेल तर या राजकीय पक्षांच्या नेत्यांना संविधानावर 100% देश चालवीण्यास भाग पाडूया.
त्यासाठी तत्वज्ञानी लोकांना राजकीय सिद्धांतावर आधारित विधिमंडळ आणि संसदेत पाठवून खऱ्या लोकशाही आणि संविधानाला अविष्कारीत करण्याचा प्रयत्न करूया..
केवळ मतदान करून त्यांना पाठवून दिले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे अजिबात नाही..
तर त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी प्रत्येक मतदार संघात लोकशाहीवादी नागरी कृती समिती स्थापन करून त्यांच्यावर निःस्वार्थपणे, कोणत्याही वयक्तिक आणि सामूहिक आमिषाला बळी न पडणाऱ्या सदस्यांचीच नागरी कृती समिती निर्माण झाली पाहिजे. तेंव्हाच तिच्याकडून आपण चांगली अपेक्षा ठेऊ शकतो..
तेंव्हाच कुठेतरी आपण आजच्या राजकारण्यांच्या तावडीतून लोकशाही आणि संविधान सोडवू शकतो.
अन्यथा याच राजकारण्यांनी निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकून संपू……
ते मात्र सहिसलामत यातून सुटून जातील….!
म्हणून…..
आपण माणूस असाल तर…..
त्या माणसात हृदय असेल तर…..
त्यात जागृत सदसदविवेकबुद्धी असेल तर…..
त्या जागृत बुद्धीला कृतीतून अविष्कारीत करण्यासाठी सिद्ध व्हा…
जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..