कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
कन्हान : – येथील तारसा रोड वरील इंदिरा नगरचे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कँमेरांवर काळा पेंट स्प्रे करून दोन्ही बँकेचे एटीएम गँस कटर ने कापुन दोन्ही एटीएम मधील ५ लाख,६० हजार,१०० रूपयाची चोरी करून अज्ञात चोर पसार झाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली.
सोमवार (दि.२२) जुलै च्या मध्यरात्री म्हणजे मंगळवार (दि.२३) जुलाच्या पहाटे २ ते ४ वाजता दरम्यान चार चाकी वाहनाने आलेल्या अज्ञात चोरानी तारसा रोड कन्हान येथील इंदिरा नगरचे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएमच्या सीसीटीव्ही कँमरे वर काळा पेंट स्प्रे करून एटीएम मध्ये प्रवेश करून दोन्ही बँकेचे एटीएम गँस कटर ने कापले व इंदिरा नगरच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधुन १ लाख, ३ हजार रूपये आणि शिवनगर येथील स्टेट बँकेचे एटीएम मधिल
दोन्ही एटीएम मधील ४ लाख ५७ हजार १०० रूपये असे दोन्ही एटीएम मधील ५ लाख ६० हजार १०० रूपयाची चोरी झाली आहे.
घटनास्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील आपल्या सहकार्यासह पोहचले आणि घटनाक्रम जाणून घेतला.यानंतर फॉरेन्सिक लँब पथकाला बोलावले.
फिर्यादी श्री.जागेश्वर कुष्णराव पौनीकर वय ३९ वर्ष राह. मालाधरे विहार जवळ पंडितपुरा,जुनी मंगळवारी रोड, नागपुर चैनल एक्जीक्यूटिव (हिताजी पेमेंट सर्विसेस) यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी थानेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल केला.
कन्हान पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.