कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- पारशिवनी पोलिस स्टेशनचा स्टाफ रात्री पाळीची पेट्रोलींग करताना,मुखबर द्वारे माहिती मिळाली की,पारशिवनी हद्दीतील मौजा घोगरा टी पॉईट पेंच रोड येथे पॅशन प्रो.मो.सा.क्र. एम.एच- ४९/ए- ०९४६ ने दारूची अवैध वाहतुक होत आहे.
अशा माहिती वरून मो.सा. क्र.-एम.एच.४९/ए- ०९४६ ने अवैद्यरीत्या दारू वाहतुक करणाऱ्या दोन इसमाच्या बाबतीत नाकाबंदी केली असता आरोपी नामे १) शिशुपाल कवडुजी चव्हान वय ३९ वर्ष,२) सुनिल दौलतराव गिरी वय ३९ वर्ष,दोन्ही रा. पिपळा ता. पारशिवनी यांच्या ताब्यातून विनापरवाना व अवैधरीत्या १) देशी दारू भिगरी संत्रा १ च्या ४८ नग निपा एमएल किमत ३ हजार ३६० रुपये,२) पेंशन प्रो. मोसा क्र. एम.एच.४९/ए ०९४६ कि. ३० हजार रूपये असा एकूण ३३ हजार३६०/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
सरकार तर्फे फिर्यादी नामे पोउपनि शिवाजी भताने पो.स्टे. पारशिवनी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे पारशिवनी येथे कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री.हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शना खाली पोस्टे पारशिवनी येथील ठाणेदार पोनि. राजेशकुमार थोरात,पोउपनि शिवाजी भताने,पोशि पृथ्वीराज चव्हान,राकेश बंधाटे यांनी पार पाडली.