ब्रेकिंग न्युज… — ट्रॅक्टर पलटी,चालकाचा जागीच मृत्यू..‌

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

          आज सकाळी नेरी ते शिरपूर मार्गावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुःखदायक घटना घडली.

         चालकाचे नाव सागर बावणे असून त्याचे वय २० वर्षाचे असल्याचे पुढे आले आहे.तो चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील रहिवासी आहे.त्यांच्या पश्चात एक भाऊ,बहिण व आई आहे.

            मजूर घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची चर्चा आहे.या दुःखद् घटनेमुळे मौजा नेरी वासियात हळहळ व्यक्त केली जात आहे.