बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील श्रेया सचिन मुडके या विद्यार्थिनीने चालू वर्षी SSC Board (10th Board) परीक्षेमध्ये 88% टक्के गुण मिळवून दुतीय क्रमांक पटकाविला.
याबद्दल माजी सहकार मंत्री Harshvardhan Patil यांच्या हस्ते Indapur येथे शाल, श्रीफळ, देऊन सन्मानित करण्यात आला व पुढील वाटचालीस Shreya mudke या विद्यार्थिनीला शुभेच्छा दिल्या.
पिंपरी बुद्रुक येथील कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय या ठिकाणी 2023 /24 या सालामध्ये आपली शाळेची जबाबदारी पार पाडत आसताना पिंपरी बुद्रुक केंद्रामध्ये 88% टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला याबद्दल आनेक ठिक ठिकाणी सन्मान करण्यात आले.
तसेच पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने विद्यमान संचालक तथा माजी सरपंच श्रीकांत बोडके, सरपंच भाग्यश्री बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, माजी सरपंच पांडुरंग बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते यांच्या सहित सर्व सदस्यांच्या व पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.
यावेळी लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या वतीनेही सन्मान करण्यात आला. तसेच जंक्शन तालुका इंदापूर येथील लिंगायत समाज व टणु येथील लिंगायत समाज आणि भिगवन येथील डॉक्टर खानावरे आमोल चंद्रकांत यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले.
जास्तीत जास्त गुण घेऊन दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल Shreya mudke यांना कुटुंबाच्या वतीने आई,वडील आणि आजोबा ,आजी यांनी शाबासकी देऊन पुढील शिक्षणस आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या.