मानाच्या बैलजोडींची आळंदीत भव्य मिरवणूक संपन्न…  — माऊलींच्या पालखी सोहळ्याचे २९ जून रोजी प्रस्थान सोहळा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणार्‍या बैलजोडीचा मान यंदा आळंदीतील कुऱ्हाडे घराण्याला मिळाला आहे. बैलजोडीचे मानकरी वस्ताद सहादू कुऱ्हाडे यांनी विकत घेतलेलं बैलजोडी मानाच्या बैलजोडीची आळंदीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

         चाकण चौक येथील स्वामी महाराजांच्या मठाजवळून फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या सनई चौघड्याच्या वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.

           यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे उपाध्यक्ष सुनील वाघमारे यांच्या हस्ते बैलजोडीची पुजा करुन मिरवणूकीस सुरुवात झाली बैलजोडीचे मानकरी योगेश कुऱ्हाडे यांचा रासने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. चाकण चौकातून भर पावसात निघलेली मिरवणूक प्रदक्षिणा मार्गावरून चावडी चौकातून, नगरपरिषद चौक मार्गावरून महाद्वार चौकात मानाच्या बैलजोडींची मिरवणुकीची सांगता झाली.

         यावेळी महाद्वार चौकात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथजी, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे यांच्या हस्ते मानाच्या बैलजोडींची विधीवत पुजन करण्यात आले. बैलजोडीचे मानकरी सहादू कुऱ्हाडे यांचा मंदीर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

         यावेळी बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, राहुल चिताळकर, डि.डी.भोसले, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, विष्णू वाघमारे तसेच आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.