
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सोमनाथ वहीले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते वहीले यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला.
यावेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, अतुल देशमुख, प्रदीप कंद, आशा बुचके, शांताराम भोसले, संजय घूंडरे, अशोकराव उमरगेकर, दिनेश घुले, माऊली बनसोडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे, राहुल घोलप, सचिन सोळंकर यावेळी उपस्थित होते.
भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करून आगामी काळात आळंदी नगरपरिषदेत भाजपचा झेंडा फडकावण्यसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सोमनाथ वहीले यांनी सांगितले आहे.