नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
आसगांव-भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथिल मनोहर वैद्य यांच्या राहत्या घरी पोवळा/रातसर्प जातीचा विषारी साप आढळून आला .
त्यामुळे सर्पमित्र नामदेव मेश्राम यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली त्यामुळे माहिती मिळताच ते आपल्या टीमसह दाखल झाले आणी त्या विषारी साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात मोकळे सोडून दिले.
पोवळा/रातसर्प सापाला इंग्रजी मध्ये slender coral असे नाव असून शास्त्रीय नाव calliophis melanurus असे आहे हा साप विषारी असून तो आकाराने अगदी लहान असतो सरासरी 1 फूट लांबीचा हा साप काळतोडया या बिनविषारी सापासरखा दिसतो पोवळा हा साप शरीराने तपकिरी रंगाचा असून डोके काळे, व शपतीवर काळे 2 आडवे पट्टे असतात शेपटी खाली निळा रंग व पोटाकडील भाग पोवळ्यासारखा नारंगी-लाल असतो हा साप निशाचर असून दिवासासुद्धा आढळतो डीचविल्यास शेपटी गोल करून शेपटी खालील लाल-नारंगी रंग प्रदर्शित करतो. या सापामध्ये neurotoxic venom प्रकारचे विष असून ते विष मज्जा संस्थेवर परिणाम करतात. हा साप लाजाळू असतो. दगड मातींमध्ये, विटांच्या ठिगाखाली पाल्यापाचोळ्यात याच वास्तव्य असते. संपूर्ण महाराष्ट्र सहित गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल व तामिळनाडू या राज्यात आढळतो. हा साप वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत शेड्युल (IV) मध्ये समाविष्ट आहे. हा साप छोटे कीटक व वाळा साप अन्न म्हणून खातो तसेच आकाराने अतिशय लहान असल्यामुळे हा साप दुसऱ्या सापांचा भक्ष्य होतो पोवळा हा साप अंडज असून मादी पानाखाली किव्हा दगडाच्या सापटीत 2 ते 7 अंडी खालतो हा साप दुर्मिळ होत चालला आहे.अश्या दुर्मिळ सापांच रक्षण करणे आपल कर्तव्य आहे.
त्यामुळे मैत्री वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुद्देशीय संस्था पवनी येतील कार्येकर्त्यांनी पोवळा या विषारी जातीच्या साप सुखरूप रित्या निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले.त्यावेळी उपस्थित , सर्पमित्र नामदेव मेश्राम ,शत्रूघन वैद्य ,शिवदास वैद्य ,गणेश खंडाडे, तन्मय वैद्य, चंदू देशमुख यांनी सहकार्य केले.