अकोट प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( बार्टी ), पुणेच्या वतिने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश अण्णाजी गाढवे ( बार्टी ), पुणे यांनी केले.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.ज्योती रामराव रामोड(इतिहास विभाग)बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी,पुणे त्यांनी जागतिक योग दिनानिमित्य योगाचे आरोग्य विषयक महत्व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच योगाचे प्रकार या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजा सदाशिव शेटे(जेष्ठ साहित्यीक, योगा शिक्षक,जेष्ठ खेळाडु)पांढरकवडा त्यांनी योगाचे सामाजिक महत्व या विषयी माहिती दिली.योगा करतांना प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावा असे मत मांडले.योगाचा उगम तसेच इतिहासाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रकाश गाढवे (सा.न्याय विभाग),बार्टी,पुणे त्यांनी योगामुळे विविध आजाराना दुर करून शारिरीक क्षमता वाढविता येते तसेच योगामुळे बौध्दीक, माणसिक ताण दुर होण्यास मदत होते असे मत मांडले. तसेच स्कॉलरशिफ, वसतीगृह प्रवेक्ष ,निवाशी शाळा प्रवेक्ष ,स्वंयसहाय्यता युवक प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विजय धों.जितकर(विधी सेवा समिती सदस्य)शिवाजी ज्यु.कॉलेज,आकोट जि.अकोला त्यांनी जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देऊन महत्व विषद केले.योगाविषयी सामाजिक जागरूकता व्हावी याकरिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कऱ्हाळे(प्र.अ.)बार्टी , पुणे यांनी केले.मान्यवरांचे आभार कु.कांचन भरणे यांनी मानले कार्यक्रमाला मोठया प्रमाणात विद्यार्थी,शिक्षक,नागरिक,कर्मचारी उपस्थित होते.