अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

 अमरावती जि प शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक येत्या 2 जुलैला होत असुन यानिमित्य समता पॅनलच्या वतीने काल दि 23 जुनला स्नेहमिलन सोहळा अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता.

    निवडणुकीच्या दृष्टीने किरण पाटील यांनी सभेला संबोधित केले. निवडणूकीत उभे असलेले इतर पॅनल यापूर्वी सत्तेत होते तेव्हा त्यांनी काय काम केलं हे ते सभासदांना सांगत नाही.

जेव्हा अखिल ची सत्ता होती तेव्हा आम्ही काटकसरीने सत्ता चालविली. कोणतीही नोकरभरती केली नाही. कोणताही प्लॉट खरेदी केला नाही. काटकसरीने व्यवहार करून बँके ची श्रेणी सुधार केली. असे वक्तव्य त्यांनी केले. भविष्यात बँक कशा पद्धतीनेच चालवावी लागेल व बँकेच्या सभासदांच्या हितांचे निर्णय घेऊन एक सक्षम वित्तीय संस्थेच्या रूपात बँकेला उभे करण्यात येईल त्याकरता समता पॅनल ला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सभेमध्ये गौरव काळे, मंगेश खेरडे प्रभाकर झोड यांनी आपले विचार व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अखिल संघाचे जिल्हाध्यक्ष पंडीतराव देशमुख, आदरणीय किरण पाटील राज्यउपाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस, निळकंठराव यावले संचालक शिक्षक बॅंक, श्री. राजाभाऊ होले कोषाध्यक्ष, विजयराव उभाड उपाध्यक्ष हे सर्व अखिल चे पदाधिकारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे कार्यक्रमाकरिता शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष संदीप भाऊ तडस अमरावती विभाग अध्यक्ष दिलीप निंभोरकर, अमरावती जिल्हा अध्यक्ष मंगेश खेरडे उपस्थित होते. जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य पदाधिकारी श्री. नामदेव मेटांगे, अतुल कडू, प्रज्वल घोम, योगेश पखाले, आणि जिल्हाध्यक्ष गौरव काळे व वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना नेते विलास राठोड, जिल्हाध्यक्ष रवि राठोड आणि जिल्हा सरचिटणीस साहेबराव आडे तसेच

महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चे काऱ्याध्यक्ष श्रीकृष्ण महोरे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समता पॅनल चे सर्व उमेदवार उपस्थित होते. 

या कार्यक्रमामध्ये नितीन देशमुख यांचे गझल व मराठी शेर शायरी आणि दिनेश शर्मा यांचे गीत गायनाने आनंद द्विगुणित केला.

स्पंदन विजय भाजपला या चिमुकल्यांच्या गायनाने मतदारांची मने प्रफुल्लित केली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील आणि वृषाली देशमुख यांनी संयुक्तपणे केले.प्रास्ताविक निळकंठ यावले तर आभार प्रदर्शन श्री सुभाष सहारे यांनी केले .

कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील हजारो शिक्षक बँक सभासद उपस्थित होते .

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ व समता पॅनल मध्ये सहभागी विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News