युवराज डोंगरे/प्रतिनिधी
दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत घरकुल संबधाने वारंवार होत असलेल्या अनियमत्तेचा प्रकार संतापजनक असून, घरकुल नियमत्तेबाबत कुठल्याही अधिकाऱ्याचा वचक राहिलेला दिसत नाही… अर्थात घरकुल मंजूर बाबतीत व मंजूर घरकुलांचा धनादेश काढण्यात बाबत दर्यापूर प.स.मध्ये अनियमत्तेचा कळस सुरु असल्याचे पुढे आले आहे.
सरकार गोरगरिबांना घरकुल तर देते.मात्र काही निवडक अधिकारी घरकुलांचा धनादेश घेण्याकरिता पैशाची मागणी केल्याचे किस्से अनेकदा पंचायत समिती दर्यापूरच्या परिसरामध्ये ऐकायला मिळालेत.
आज असाच एक प्रकार घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी युवा सैनिकांना घेऊन पंचायत समिती दर्यापूर येथे गटविकास अधिकारी यांच्या समोरच कंत्राटी अभियंता यांना युवासेना स्टाईलने धारेवर धरले.
सदर प्रकार असा की वडनेर गंगाई येथील एका लाभार्थी गरजू व्यक्तीला घरकुल मंजुर झाले. परंतु घरकुलाचा धनादेश काढण्याकरिता संबंधित कंत्राटी अभियंत्याने सदर लाभार्थ्याकडून पाच हजार रुपये घेण्याचा आरोप केला.
त्यासंदर्भात आज संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले असता त्या संबंधित कंत्राटी अभियंत्याने उडवा उडवीचे उत्तर दिले.
संबंधित लाभार्थीचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत येणाऱ्या यादी मध्ये नाव असून सुद्धा एका संबंधित लाभार्थ्याला डावलण्यात आले असून सदर लाभार्थ्याकडून घरकुल मंजूर करून देतो म्हणून त्यांच्या कडून गावातील नागरिक व संबंधित अधिकारी या दोघांच्या संगनमताने त्या लाभार्थ्याकडून पाच हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांनी सुरुवातीला दोन हजार रुपये दिले असताना जो मधातील दलाल होता त्याने असे म्हटले की साहेबांनी अजून पैसे मागितलेले आहेत, लाभार्थ्यांने तीन हजार रुपये संबंधित अधिकाऱ्यांच्या हाती दर्यापूर येथील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे दिले,असा आरोप त्या लाभार्थ्यांनी केले.
या संदर्भात युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी पाठपुरावा केला असता संबंधित अधिकारी व लाभार्थी यांना गटविकास अधिकारी यांच्या चेंबर मध्ये बोलावण्यात आले व त्या अधिकाऱ्याला विचारण्यात आले असता त्या अधिकाऱ्याने माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे असून असा स्पष्टपणे उल्लेख केला.
रुपये देवाणघेवाण प्रकारातंर्गत निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी दर्यापूर यांनी जो कोनी अधिकारी दोषी असेल त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करु अशी चर्चेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.
यावेळी युवासैनिक विशाल बागडे, मनोज लोखंडे, स्वप्निल विल्हेकर, सागर वडतकर, मनोज लाड, मुसाभाई मन्सूरी, युनूस मन्सूरी, संतोष चव्हाण, सतीश जामनिक तसेच युवासैनिक उपस्थित होते.