डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली,(जिमाका)दि.24: समस्याग्रस्त व पीडीत महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे.तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा.या दृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर गडचिरोली येथील जिल्हा परिषद, हॉयस्कुल (म.शा.) चामोर्शी रोड, गडचिरोली येथील सभागृहात दिनांक 29 मे 2023 स्त्री शक्ती समाधान तथा सश्सक्त नारी समृध्द भारत शिबीराचे आयोजन केल्याची माहिती महेंद्र गणवीर, तहसीदार, गडचिरोली तसेच नारायण राणु परांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गडचिरोली यांनी दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे आयोजन दिनांक 29 मे 2023 जिल्हा परिषद, हॉयस्कुल (म.शा.) चामोर्शी रोड गडचिरोली येथील सभागृहात सकाळी 9 ते 12 वाजे पर्यंत करण्यात आलेले आहे. तालुकास्तरावरील सर्व विभागाच्या योजनांची माहिती तालुका स्तरावरील विभाग प्रमुखंकडून देण्यात येणार आहे.
तसेच महिलांच्या विविध विभागातील समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. महिला तक्रार निवारण शिबीरात गडचिरोली तालुक्यातील गरजू महिलांनी जास्तीत जास्त सेख्येने उपस्थित राहावे. व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन महेंद्र गणवीर, तहसीदार, गडचिरोली तसेच नारायण राणु परांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गडचिरोली यांनी केले आहे.