ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली: नागरी वस्तीत देशी दारू दुकानाला परवानगी दिली ही परवानगी कोणत्या अधिकाऱ्याने कोणाच्या परवानगीने आणि किती पैशात दिली असा संतप्त सवाल महिला व नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली यांना केला.
नवजीवन कॉलनी सेंदरवाफा येथे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती, दवाखाने ,बालोद्यान ,मंदिरे असून या वस्तीमध्ये देशी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र नगरपरिषदेने दिले कसे व प्रस्तावित दारू दुकान परवानगी करिता प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविले कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सेंदुरवाफा येतील श्री बेणुधर केशव शेंडे यांच्या जागेवर अजय श्रीचंद कुंभवाणी रा.नागपूर सी एल-३ अनुज्ञप्ती देशी दारू दुकान तुमसर येथून नगरपरिषद सेंदुरवाफा साकोली येथे प्रस्तावित देशी दारू दुकान परवानगी करिता प्रकरण पाठविले असे माहिती मिळतात प्रतिष्ठित नागरिक व महिला मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली येथे जाऊन निवेदन दिले.
प्रस्तावित दुकानाच्या समोर राष्ट्रीय महामार्ग असून या भागात बगीचा मंदिर व दवाखाने आहेत या बगीच्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, पुरुष फिरायला जातात तसेच नर्सिंग होम दवाखाना असल्याने दिवसभर गरोदर माता ये जा करीत असतात फिरायला जाताना तसेच भविष्यात रहिवाशांच्या जीवीतास धोका होण्याच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो.
नगरपरिषद साकोली सेंदुरवाफा कार्यालयाचे रहिवासी नागरिक तसेच दवाखाने यांची कोणतेही प्रकारची विचारपूस व परवानगी न घेता ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून हा नागरिकांवर अन्याय होत असल्याची समजते.
भविष्यात देशी दारू दुकान सुरू झाले तर रहिवाशांना व दवाखान्यात येणाऱ्या नागरिकांना च्या जीवितास प्रश्न उद्भवू शकतो त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही निवेदन देतानी मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली यांना विनंती केली की आपण दिलेले ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे व भविष्यात आपण दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्र रद्द केले नाही आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी मुख्याधिकारी नगरपरिषद साकोली यांची राहील असे निवेदनाद्वारे आवाहन करण्यात आले.
निवेदन देतेवेळी डॉ माधव खोटेले, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ अनिल मारवाडे, सुभा खोटेले, गौरी बिसेन ,कांचन मेंढे, प्रांजली बडोले, रेश्मा वहीद शेख, प्रमिला साखरे ,अंतकला बनसोड, सपना बनसोड ,तृप्ती बावनकर, त्रिवेणी रामटेके, प्रभा कोटांगले, गुणीराम बिसेन, पराग भांडारकर तसेच अनेक नागरिक व महिला उपस्थित होत्या.
आम्ही ना हरकत प्रमाणपत्र व्यवसायासाठी दिलेले असून व्यवसाय कोणते आहे याची चौकशी करून दोन दिवसात लेखी उत्तर देऊ तसेच तुम्हाला योग्य न्याय देऊ.