कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधि पारशिवणी
कन्हान :- आकाश आंजनकर यांचे वेडींग प्लॅनर चे काम करित असुन सामान ठेवण्याकरिता वाघधरे वाडी येथे गोडाऊन मध्ये ठेवलेली डिस्कव्हर दुचाकी कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याची फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोस्ट कन्हान येथे गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस दुचाकी व आरोपीचा शोध घेत आहे.
आकाश भास्करराव आंजनकर वय २७ वर्ष रा. महात्मा फुले चौक वराडा ता. पारशिवनी हा वेडींग प्लॅनर चे काम करित असुन वाघधरे वाडी कन्हान येथे सामानाचे गोडाऊन व साईनाथ कँटर्सचे गोडऊन तसेच माऊली अँक्वा आरो असुन ते बाळकृष्ण घारड रा. खंडाळा यांचे शेतात आहे. त्यांचे वर त्याची देखरेख असते. आकाशच्या भावाने सन २००७ मध्ये डिस्कव्हर दुचाकी १०० सीसी क्र. एमएच ४० जे १८७९ विकत घेतली असुन ती तो आपल्या धंद्यात वापरतो. काम नसल्याने मंगळवार (दि.१६) एप्रिल ला डिस्कव्हर दुचाकी वाघधरे वाडी येथील गोडाऊन मध्ये ठेवली होती. (दि.१७) ला दुचाकीचे काम असल्याने दुपारी १२ वाजता दरम्यान दुचाकी घेण्याकरिता वाघधरे वाडीच्या गोडाऊन मध्ये गेला असता तेथे दुचाकी दिसली नसल्याने शेतातील बाळकृष्ण घारड यांना विचारपुस केली तर ते म्हणाले सकाळी १० वाजता दुचाकी बघितली तेव्हा होती.
दुचाकीचा आजुबाजुला पाहणी करून विचारपुस केली असता समजले दुचाकी गावातील अमोल गि-हे त्या दिवशी घेऊन जातांनी दिसला होता. त्याचा शोध घेतला असता तो त्याचा घरी तसेच गावात दिसुन आला नाही. डिस्कव्हर दुचाकी १०० सीसी क्र एमएच ४० जे १८७९ किमत २०००० रुपये काळ्या रंगाची जिचा चेसीस क्र.एमडी२डीएसडीएक्सझेडझेड एनएएल८०७८२, इंजिन क्र.डीएक्सइबीएन एल ८१७०० (दि.१७) एप्रिल २०२४ चे १० ते १२ वाजता दरम्यान कुणीतरी चोरून नेली असावी. करिता मंगळवार (दि.२३) एप्रिल ला फिर्यादी आकाश आंजनकर यांचे तक्रारीवरून पोस्ट कन्हान येथे गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस दुचाकी व आरोपीचा शोध घेत आहे.