
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना व वन विभाग साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने चिमणी दिवस, वन दिवस, जल दिवस, आणि पर्यावरण दिवस मोठ्या उसात साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती. आर. बी. कापगते तसेच प्रमुख अतिथी म्हणून इन्होकेअर नेचर क्लबचे प्रा. डॉ. एल. पी. नागपूरकर सर ,सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दखणे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर.कटरे साहेब, बारसागडे साहेब, अंबुले मॅडम, डी.एस. बोरकर सर, व्ही.बी. काशीवार सर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोस्टर्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सुंदर कलाकृती सादर केल्या. चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे तयार करून ती शाळेच्या परिसरात लावली. वनदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व समजून घेतले. पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक मुक्ती यावर आधारित पोस्टर तयार करून समाजाला पर्यावरण रक्षक काळाची गरज आहे असा संदेश दिला.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. एल.पी.नागपूरकर सर विद्यार्थ्यांना संबंधित करताना म्हणाले, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी या सर्वांचा एकत्रिकरणाला पर्यावरण म्हणतात. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. कारखान्यांचे धूर ,वाहनांचे प्रदूषण ,कचऱ्याचे ढिगारे यामुळे हवा आणि पाणी दूषित झालेला आहे. जंगल तोडीमुळे वन्यजीव विस्कटित सापडलेला आहे. हवा आणि पाणी दूषित झाल्यामुळे अनेक आजारांची उत्पत्ती होताना दिसत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे मौलिक विचार ठेवले.
विविध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख आर. व्ही. दिघोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन यु. एन. कटकवार सर यांनी केले.
कार्यक्रमाकरिता विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.