धर्मापुरी येथे छ.शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली :- शिवप्रतिष्ठान समिती धर्मापुरी यांच्या अथक प्रयत्नातून दि. १७/०३/२०२५ रोजी धर्मापुरी कुंभली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.

         या लोकार्पण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. डॉ. प्रशांत पडोळे तसेच सरपंचा पुष्पा खोटेले, जि. प. सदस्य वनीताताई डोये, प. स. सदस्य सरिता कारंजेकर , समाजकल्यान सभापती. शितलराऊत , जि. प. सदस्य मदनभाऊ रामटेके , नानाभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी उमेशभाऊ भेंडारकर , हरगोविंदजी भेंडारकर , सचिव. एल. एम. नान्हे, , पंचायत समितीचे सभापती ललित हेमने, पोलिस पाटील,सुशील भोंगाडे मान्यवर उपस्थित होते.

           या कार्यास शिव प्रतिष्ठान समितीला आमदार नानाभाऊ पटोले यांनी आर्थक मदत केली. तसेच ग्रामपंचायत कार्यालय आणि समस्त धर्मापुरी गावकरी यांच्या सहकार्यातून हे कार्य पूर्णत्वास आले शिवप्रतिष्ठान समितीच्या समितीचे अध्यक्ष भूपेश कोहळे यांनी आभार मानले