आरमोरी येथे इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख यांना श्रद्धांजली…

अश्विन बोदेले 

जिल्हा प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

आरमोरी :- आरमोरी येथे श्रीमती. निलीमा निलकंठराव दोनाडकर यांच्या निवासस्थानी प्रा. मा. म. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मा.विजयकुमार ठवरे साहेब, सेवानिवृत्त विकास अधिकारी नॅशनल इंशुरन्स, प्रमुख अतिथी म्हणून मा.विलास गोंदोळे सर, संपादक विधायक न्युज, प्रा. प्रशांत दोनाडकर, श्रीमती. निलीमा निलकंठराव दोनाडकर,मा. रणजित बनकर, जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मा. देवानंदजी दुमाने, मा. कुथे सर, प्रा. मेश्राम सर, हितकारिणी ज्यु. कॉ, मा. लिलाधर मेश्राम उपस्थित होते. 

             अध्यक्षीय मार्गदर्शनातुन ठवरे साहेबांनी प्रा. मा. म. देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.आरमोरी येथे महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रा. मा. म. देशमुख यांच्या हस्ते झाले होते. मा. गोंदोळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रा. मा. म. देशमुख यांनी मनुवादी व्यवस्थेवर लिखाण केल्यामुळे नागपूर येथे काही समाजकंटकांनी प्रेतयात्रा काढली होती.

          तर समर्थकांनी त्याविरोधात प्रेमयात्रा काढत त्यांच्या लेखनाला पाठिंबा दर्शविला. प्रा. प्रशांत दोनाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रा. मा. म. देशमुख यांच्या सोबत झालेल्या भेटीचा प्रत्यक्ष अनुभव सांगितले. नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी गेले असता स्वतः त्यांनी आपल्या स्वहस्ते पुस्तके पॅक करून दिले व त्याची किंमत ना नफा ना तोटा या तत्वावर ३० टक्के डिस्काउंट नुसार घेतले.

           तसेच याप्रसंगी सर्वांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मेश्राम, प्रस्ताविक मा. कुथे सर व आभार मा. लिलाधर मेश्राम यांनी मानले.