
बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील पीरसाहेब मंदिर ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीर बाबा) यात्रा उत्साह निमित्त निकाली कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले.
पिंपरी बुद्रुक ग्रामस्थ व संपूर्ण गावची एकी व विचार एक या तत्त्वावर चालत आलेली पिंपरी बुद्रुक गावची तीन पिढ्यापासून परंपरा आजही एका विचाराने चालू आहे.
ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक, साखर कारखान्याचे संचालक, सरपंच ,उपसरपंच, आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्या सौजन्याने सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत पिरसाहेब (उदगीर बाबा) यांची यात्रा (ऊरूस)संपन्न झाला.यानिमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मैदान भरविण्यात आले.
अनेक जिल्ह्यातून मल्लांनी कुस्ती आखाड्यामध्ये हजेरी लावली. 50 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंत इनामच्या निकाली कुस्त्या यावेळी लावण्यात आल्या.
या कुस्ती आखाड्यामध्ये पंच म्हणन संचालक,संजय बोडके, संचालक श्रीकांत बोडके ,सुनील बोडके,तुकाराम मगर, नीलेश बोडके, हरिदास वाळेकर, ज्ञानेश्वर बोडके मेजर, दिपक बोडके, शरद बोडके, नवनाथ वाळेकर, व्यंकट बोडके ,दीपक बोडके, आशोक वाळेकर, निलेश बोडके, राजेंद्र मगर, पिंटू बोडके, व्यंकट बोडके, दादा शेख, शिवाजी गायकवाड, रंजीत वाघमोडे ,राजेंद्र शेलार,वैभव पडळकर, यांनी काम पाहिले.
यात्रा कमिटीचे प्रमुख मान्यवर आनंता बोडके, बबनदादा बोडके, लालाआबा बोडके, आशोकआबा बोडके, रामभाऊ लावंड, नामदेव बोडके, श्रीकांत बोडके, आबासाहेब बोडके, वर्धमान बोडके, चांगदेव बोडके, पांडदादा बोडके, बाळासाहेब बोडके, बाळासाहेब घाडगे, दतुनाना बोडके, समाधान बोडके, दत्तू बोडके, संतोष सुतार, रमेश मगर, हनुमंत सुतार, बाळू पडळकर, शहाजी बोडके, कल्याण भंडलकर, बपा मगर, राहुल शिन्दे, बाळासाहेब शेलार, अनिल गायकवाड, सोमनाथ कांबळे, नबिलाल शेख, बाळू आतार, मल्हारी सूर्यवंशी, सिकंदर शेख, खुदबुद्दीन शेख, अनिल पाटील, जमीर शेख,अण्णा पाटील, बिभीषण सूर्यवंशी, कल्याण बोडके,अरुण सूर्यवंशी, विलास नरूटे, सौदा काटकर, आजीनाथ बोडके सह अनेक ग्रामस्थ तसेच बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी राऊत साहेब व सर्व अधिकारी सह हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कुस्ती आखाड्याचे निवेदक भाऊसाहेब काळे टाकळी व महेश सुतार यांनी केले.