
स्वार्थ,मोह आणि भेदभाव….
” भेद ” या शब्दाचा अर्थ होतो ” विभाजन”. विभाजन याचा अर्थ एकाचे दोन करणे,मग ती वस्तू असो,माणूस असो,समाज असो,समूह असो,जमीन असो,प्रांत असो,की देश असो.यात विभाजन करणे म्हणजे भेद करणे,तसेच जातीभेद म्हणजे एक मानव जात त्याचे विभाजन म्हणजे अनेक जाती करणे,म्हणजे विभाजन करणे म्हणजेच जातीची व्यवस्था रचना निर्माण करणे,माणसात गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग निर्माण करणे,म्हणजे भेदभाव करणे,हा आहे आर्थिक भेदभाव,एक ” मानवधर्म ” पळण्या ऐवजी अनेक धर्म पाळणे,म्हणजे भेदभाव करणे होय.एक ईश्वर न मानता अनेक ईश्वर मानणे,अनेक देव मानणे,म्हणजे भेदभाव होय.
जिथे श्रेष्ठत्व आणि कनिष्ठ त्वाची ,उच्चनीच त्वाची , वंशत्वा ची भावना निर्माण होते,तिथे भेदभाव पैदा होतो.
हा भेदभाव माणसाच्या विकृतीतून निर्माण होतो,अहंकार आणि मोहतून निर्माण होतो.अहंकार झाला की,मोह निर्माण होतो.मोहामुळे स्वार्थात वाढ होते,म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ” अहंकाराचा वारा न लागो राजसा ” ….
रज,तम,सत्व असे माणसात त्रिगुण आहेत,माणूस राजा असतो,म्हणजे मुळात तो स्वतंत्र च असतो,अशा वेळी त्यास अहंकाराचा वारा लागला तर तो बिघडतो,तो तम गुणी बनतो,म्हणजे क्रोधी रागीट बनतो.म्हणून माणसाला माणूस असण्याचा अभिमान असावा,पण गर्व नसावा,म्हणजे अहंकार नसावा,जातीचा गर्व झाला की तो जातीवादी बनून जातीभेद करतो,धर्माचा गर्व झाला की तो माणूस धर्मवादी बनून धर्मभेद करतो,देववादी झाला की तो देव दैव वाद करतो,देवदेवता मध्ये भेदभाव करतो,राजाला अहंकार झाला की,तो हुकूमशहा बनतो.
म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा,माणसा,असे संत उपदेश करून माणसातील. भेदभाव नष्ट करून त्यास विकृत न बनता सुसंस्कारी बनवतात.
” स्वार्थ ” हा गुण नसून दुर्गुण आहे,तो प्रत्येक माणसात असतोच.स्वार्थ हा मानवनिर्मित किंवा इस्वरनिर्मित नसून तो निसर्गनिर्मित आहे.
निसर्गानेच माणूस जन्मतःच स्वार्थी आहे.स्वर्थामुळे मोह निर्माण होतो,आणि मोहातून अहंकार निर्माण होतो,कधीमधी स्वर्थामुले अहंकार आणि अहंकारामुळे मोह पण निर्माण होतो.
या मोहापासून माणूस अधिकाधिक स्वार्थी बनतो,याचा अर्थ मोह आणि अहंकार झाला की,माणूस स्वार्थाची मर्यादा सोडतो,तो जात्यांध ,धर्मांध,देवांध,वर्गांध बनतो,आणि त्यात भेदाचे भाव उत्पन्न होतात,उच्चनीचता चे भाव विचार पैदा होतात,म्हणून तो शोषण,अन्याय,अत्याचार,पिळवणूक,भ्रष्टाचार असे अनेक भ्रष्ट आचरण करायला लागतो,अशा या मानवी आचरण व्यवहारातून च विषमता निर्माण होते, विषमता वादी समाजरचना , वर्गवादि अर्थरचना व्यवस्था निर्माण होऊन ती स्थापन पण होते.ही विषमतावादी रचान स्वार्थ मोह भेदभाव या गोष्टींना पूरक ठरते,या विकृत मानसिकतेला खतपाणी घालते.
मोह हा सत्तेचा असो ,संपत्तीचा असो,प्रतिष्ठेचा मानपान च असो,या मोहामुळेच विषमता निर्माण होते,या मोहास संधी मिळते,या विषमतावादी समाज रचनेत.विषमतावादी सत्तेस संधी मिळते या विषमतावादी समाजरचनेमुळे.
म्हणून सत्ता परिवर्तन हे धेय्य असता कामा नये,तर त्यास व्यवस्था परिवर्तनाचे साधन मानले पाहिजे.आणि व्यवस्था परिवर्तन हे धेय्य मानले पाहिजे.तरच स्वार्थ मोह आणि भेदभाव यास लगाम बसेल.