
निसर्गनियमावर आधारित असलेली स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता ही लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर प्रथम हल्ला चढवला,तो साम, दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीवर आधारलेल्या आणि बाहेरून आलेल्या आर्यानी अर्थात ब्राम्हण्यवृत्तीने !
यांच्या विरोधात प्रथम शह दिला तो भगवान बुद्धानी धम्माच्या संशोधान क्रांतीतून.हा शह मनुवाद्याच्या जिव्हारी लागला. म्हणून त्यांनी या विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी धम्माला कलंकित करण्यास सुरुवात केली ती महायान आणि हीनयान या पंथाची निर्मिती करुन. पुढे त्रिपीटक ग्रंथात काल्पनिक जातककथा पेरून धम्मातील विज्ञानवाद संपुष्टात आणला. आणि धम्मालाही धर्माच्या रांगेत आणून ठेवले.
परिणामी या देशातून धम्म लयास गेला.पुढे सम्राट अशोक,सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन यांनी या धम्माला राजाश्रय मिळवून देऊन पुनःरुजीवित केले.या तीन साम्राटांची ही क्रांती याच कुटनीतीच्या अर्थात मनुवाद्याच्या पुन्हा जिव्हारी लागली.
एकतर या मनुवाद्यांमध्ये वैचारिक वादविवाद करुन सत्य आणि सम्यक विचार स्वीकारण्याची मर्दूमकी नसते. म्हणून ते नेभळट आणि षंढ कुटनीतीचा मार्ग स्वीकारून बहुजन समाजाला या सदविचारी बनवणाऱ्या विवेकवाद + विज्ञानवाद = मानवतावादापासून तोडून अंधश्रद्धेच्या, कर्मकांडाच्या धार्मिकतेचा पगडा बिंबवतात.आणि हा बहुजन समाज सुद्धा अलगद त्यांच्या जाळ्यात फसतो. तो कधीही बाहेर न पडण्यासाठीच!
आणि असा व हाच बहुजन समाज या मनुवाद्यांची खरी संपत्ती आहे.
म्हणूनच आमच्या देशात याच बहुजन समाजाच्या जोरावर ही कुटनीती देशातून हद्दपार होत नाही.हे वास्तव आहे.
म्हणूनच सम्राट हर्षवर्धन यांच्यानंतर पुष्यमित्र शून्गाने कपटाने राज्य बळकावून पुन्हा एकदा या देशात मनुवाद्याची कुटनीती कायमची स्थिरावली. या साढेतेराशे वर्षात अनेक बाहेरून राजकीय आक्रमणे आमच्या देशावर झाली.परंतू ,ही कुटनीती मात्र विकसितच होत गेली.
याच काळात अनेक संतांनी म्हणजे संत कबीर,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम इत्यादी संतांनी या कुटनीतीविरोधात कीर्तनातून परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.परंतू त्यात म्हणावे असे यश आले नाही.
परंतू एवढे निश्चितच झाले की समाज विचार करू लागला.आणि याच विचार करण्याच्या मानसिकतेचा उपयोग म.बसवेश्वर,छ.शिवाजी महाराज,म.फुले,सावित्रीबाई फुले,छ.शाहू महाराज यांना काही प्रमाणात क्रांती करण्यास कारणीभूत झाला.पण तरीसुद्धा हजारो वर्षांच्या नसानसात भिनलेल्या कुटनीतीला साधा धक्काही लागला नाही.
या साढेतेराशे वर्षात भारतीयांच्या नसानसात भिनलेल्या त्या कुटनीतीच्या गुलामीची मानसिकता…
एकाच झटक्यात हजारो रिष्टेल स्केलचा भूकंप जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका….
भारताचे संविधान देशाला प्रदान करुन ही गुलामी कायमची नष्ट केली असेल.
तर ही संविधानक्रांती या मनुवाद्याच्या किती आरपार जिव्हारी लागली असेल.
साढेतेराशे वर्षात फोफावलेल्या,रुजलेल्या,स्थिरावलेल्या,कुटनीतीचा इतिहासच जर संविधान कायमचे पुसत असेल तर.याच RSS,मोदी,शहा,भागवत,फसणवीस या संविधानाला संपविण्यासाठी बाह्या वर करणारच ना….
म्हणूनच नवी मनुस्मृती ” EVM ” आमच्या ( भारतीय जनतेच्या ) बोकांडी बसवून लोकशाही आणि संविधान संपवीण्यास सुरुवात केली आहे.त्यासाठी त्यांनी विरोधी पक्षाला संपवण्याचा घाट घातला.त्यातही ते यशस्वी झाले.उरला विरोधक तो केवळ आणि केवळ आक्रमक आंबेडकरवादी समाज अर्थात इतर सर्वच संविधानवादी समाज!
यांच्यातही यांनी पैशाची लालूच दाखवून,प्रसंगी हतबल करुन,त्यांना संपविण्याचा विडा उचललेला आहे.
परंतू,हा संविधानवादी समाज,आक्रमक आंबेडकरवादी समाज, त्याचप्रमाणे बहुजनसमाजातील उगवती डोळस युवापिढी कधीही या…..
RSS,मोहन भागवत,धूर्त आणि लबाड मोदी,तडीपार आणि फसणवीस या चांडाळ चौकडीच्या 2025 मधल्या कोणत्याही कुटनीतीला बळी पडणारी नाही…..
नाही,नाहीच!,कारण……
सत्य परेशान जरूर होता हैं, लेकिन पराजित कभी नही!
कारण आमच्याकडे निसर्गनियमावर आधारित असलेला मानवतावाद आहे.जो कुटनीतीला कधीही यापुढे स्थिरावू देणार नाही…
केवळ आम्ही आमच्यातला संविधानवादाचा आणि मानवतावादाचा आत्मविश्वास कधी संपवू द्यायचा नाही आणि कोणत्याही परिस्थितीत निराशेला जवळ फिरकुही द्यायचे…