ब्रेकिंग न्यूज… – नेरी शेत शिवारात फिरणारी वाघीन अखेर जेरबंद…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी  

  चिमूर तालुकातंर्गत नेरी आणि मोखाडा शेत शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या वाघीनिला जेरबंद करण्यात दिनांक २४ मार्चला पहाटे ५.३० वाजता चे सुमारास वन विभागाच्या टिमला यश आले. 

         नेरी, मोखाडा या परिसरातील शेत शिवारात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दर्शन देत कधी कधी धुमाकूळ घालणाऱ्या वाघीनिची या भागात दहशत निर्माण झाली होती याची माहिती वन विभागाला देण्यात आली.

            वन विभागाच्या टिमने त्या वाघीनिला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडुन त्या भागात ट्रॅप कॅमेरे कठळे लावण्यात आले होते. अखेर तिन दिवसाच्या अथक प्रयत्नातून त्या वाघीनीला मोखाडा नदीपात्रात कठळ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाच्या टिमने यश मिळविले आहे.पकडण्यात आलेल्या वाघीनीला निसर्ग सानिध्यात सोडुन देण्यात आले आहे. 

            सदर वाघीनिला पकडण्यासाठी रेस्कु टीम मध्ये महेश गायकवाड सहाय्यक वन संरक्षक अधिकारी ब्रम्हपुरी,वन परिक्षेत्राधीकारी कन्नमवार साहेब तळोधी,राकेश ओझा बायोलाजीकल ब्रम्हपुरी,डाॅ. नीशीकांत खोब्रागडे,मराठे शुटर,आणी टिम तसेच नेरी चे क्षेत्र सहाय्यक सि एन रासेकर,बिट वन रक्षक दिलीप वळजे पाटील,सचिन पुस्तोडे,अरुण सहारे,प्रमोद कोडापे या वन विभागाच्या टिमने अथक परिश्रम केले.