कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पाराशिवनी : – समटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने माझ्या नावाचा विचार करणे अभिप्रेत होते.परंतु माझ्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही.यामुळे शंकर चंहादे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.
श्री शंकर चिंतामन चहांदे रा.कन्हान,तालुका पारशिवनी,जिल्हा नागपुर,हे सन १९९२ पासुन भारतीय जनता पार्टी मध्ये कार्यरत होते.ज्या वेळी अनुसूचित-जाती कडून कोणही व्यक्ति निवडणुक लढण्यास तयार नव्हते,तेव्हा सन १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणुक त्यांनी पक्षाकडून लढविली होती.
तेव्हा पासून आजतागायत भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी जी जी आदेशान्वये जबाबदारी दिली ती पक्षाशी एकनिष्ट राहुन प्रामाणिकपणे,माझा कोणताही स्वार्थ न ठेवता पार पाडली असेही ते म्हणाले.
त्यांनी भुषवलेली पदे १) १९९२ मध्ये जि.प.सदस्य पदाची निवडणुक लढविली. २) १९९४- २००७ अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष नागपुर जिल्हा, ३) १९९७ – २००२ सदस्य जि.प.सदस्य नागपुर, ४) १९९८-९९ समाज कल्याण सभापती जि.प.नागपुर,५) २००२ – २००७ सदस्य जि.प.नागपुर, ६) २००७ -२०१३ भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय परिषद सदस्य, ७) २०१५ – २०२० सदस्य नगरपरिषद कन्हान-पिपरी, ८) २०१७- २०२० नगराध्यक्ष नगरपरिषद कन्हान-पिपरी, ९) २०२० ते आज पर्यंत नामर्निदेशीत सदस्य नगर परिषद कन्हान,या मागील ३२ वर्षा पासुन भारतीय जनता पक्षा मध्ये कार्यरत असतांना प्रमुख पदाकरिता माझ्या नावाचा पक्षाने विचार करायला पाहीजे होता.
मला डावलण्यात आले असुन माझ्यावर अन्याय झालेला आहे.तसेच समटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने त्यांच्या नावाचा विचार करणे अभिप्रेत होते.परंतु त्यांच्या नावाचा विचार करण्यात आलेला नाही.
त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्यत्व व सर्किय पक्षाचा राजीनामा भाजपा नागपुर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांचे कडे पाठविलेला आहे.