स्वतःच्या मनाला प्रश्न विचारताच?…

आताच्या वातावरणात डोकं ठिकाणावर ठेवायचं असेल तर सतत स्वतःला प्रश्न विचारा !!

    फक्तं दोनच प्रश्न विचारले तरी चालतील.

१) देश कशावर चालतो ?

      शोध घ्या.वाचत रहा.

चर्चा करा.अभ्यासू लोकांना विचारा.

नीट लक्षात ठेवा….

— देश हा इकॉनॉमीवर चालतो.

— देश हा आर्थिक प्रगती वर चालतो.

— देशाची आर्थिक प्रगती कशी होते ?

खालील गोष्टींनी.‌..

— कायदा आणि सुव्यवस्था.

— राजकीय स्थैर्य..

— शिक्षणाचं प्रमाण..

— नागरिकांचे कष्ट..

— नेत्यांची दूरदृष्टी.. 

       देश भावनांवर चालत नाही.

देव ही आपली श्रद्धा आहे भावना आहे.. म्हणून देश देवळांवर चालत नाही.

***

२) मी कोण आहे ?

सतत स्वतःला हा प्रश्न विचारा ?

मी हिंदू आहे.

मी मुस्लिम आहे.

मी मराठा आहे.

मी धनगर आहे.

मी महार आहे.

मी ब्राह्मण आहे.

मी शिख आहे.

मी बौद्ध आहे..

मी ख्रिचन आहे.

मी जैन आहे.

मी अनेक जातींपैकी एक आहे.

वरील पैकी उत्तर येत असेल तर आपण चुकतोय !!

**

 — मी सर्वात आधी भारतीय आहे.

 — माझा धर्मग्रंथ संविधान आहे.

 — मला जन्माने मिळालेला धर्म मी घरात पाळतो..

— संविधान माझ्या धर्माचे रक्षण करणार..

   हे विचार जर मनात रुजले असतील तर प्रजासत्ताक लोकशाही देशात,”धार्मिक कार्यक्रम 

सरकारने साजरे करणे

मला नागरिक म्हणून चुकीचं वाटेल….

    माझ्या आजूबाजूचे नातेवाईक मित्रमंडळी कितीही उन्मादी अवस्थेत असली तरीही मी माझ्या विचारांशी प्रामाणिक राहीन 

कारण

या देशावर माझं प्रेम आहे !!

**

तळटीप :

सतत बोलत रहा.

विचार मांडत रहा.

**

तळटीप :

हुकूमशहा भित्रे असतात.

ते सामान्य माणसाच्या बोलण्याला घाबरतात !!!!

            ©डी.उषा