
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 चे घटक क्र. 1 नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील लाभार्थ्यांना व्यक्तिगत स्वरुपात घरकुल बांधण्यास शासनाच्या निकषानुसार स्थायी पट्टे (स्वतः मालकीची जागा) असणाऱ्या नागरिकांना (बांधकाम प्रतिबंधित क्षेत्र वगळता) घरकुलाचा लाभ घेण्यास (रु. 2.50 लक्ष अनुदान) प्राप्त करता येते.
सदर सुविधेचा लाभ घेण्यास सर्व पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या CSC सेंटर/सेतु केंद्रावर जाऊन केंद्र शासनाच्या https://pmay-urban.gov.in या वेबसाईटवर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती अपलोड करुन (Online) अर्ज करावा.
सदर योजनेबाबत आवश्यक माहितीकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालय, सात-मजली इमारत, प्रथम माळा, घरकुल विभाग येथे संपर्क साधण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.