
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मुरपार नियतक्षेत्र मिनझरी येथील शेतातील विहीरीमध्ये पडून वन्यप्राणी बिबट (मादी) आकस्मितरित्या मृत पावले.
मिनझरी गावापासून 1 किलोमिटर अंतरावर श्री. प्रकाश श्रीराम पोहनकर, रा.मिनझरी यांच्या मालकीचे शेत सव्र्व्हे क्रमांक 27 मौजा मिनझरी येथील शेतातील विहीरीमध्ये वन्यप्राणी बिबट पडून मृत पावल्याची घटना दिनांक 24.02.2025 रोजी वेळ सकाळी 09.00 वाजता नियतक्षेत्र वनरक्षक मिनझरी यांना गस्ती दरम्यान माहीती मिळाली.
घटनेची माहीती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमुर यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी जावून पाहणी केली असता वन्यप्राणी बिबट हा विहीरीमध्ये मृतावस्थेत आढळला.
त्यांची माहीती उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी यांना देण्यात आली.
थोड्याच वेळात मानद वन्यजीव रक्षक तसेच तरुण पर्यावरणवादी मंडाळाचे श्री. अमोद गौरकर घटनास्थळी हजर झाल्यावर त्यांचे समक्ष पंचनामा व जप्तीनामा नोंद करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलमान्वये वनगुन्हा क्रमांक 09141/228509/2025, दिनांक 24/02/2025 अन्वये नोंदविण्यात आला.
सदर मृत बिबट (मादी) यांचे शव वनविश्राम गृह खडसंगी येथे आणण्यात आले. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नागभिड, पशुधन विकास अधिकारी नागभिड व पशुधन विकास अधिकारी चिमुर यांचे हस्ते सर्वासमक्ष शवविच्छेदन करुन रासायनिक विश्लेषणाकरीता विसेरा घेण्यात आला. व त्याच ठिकाणी सर्वासमक्ष त्याचे शव दहन करण्यात आले.
सदर बिबट (मादी) अंदाजे वय 6 वर्षाचे असून त्यांचे सर्व अवयव शाबूत होते. वन्यप्राणी बिबट (मादी) शिकारीच्या शोधात वन्यप्राण्यांच्या मागावर भटकत असतांना विहीरीत पडून पाण्यात बुडाल्यामुळे मृत पावला असावा असा प्राथमिक अंदाज असून सदर मृत बिबट प्रकरणाचा तपास सुरु आहे.
सदर घटने दरम्यान चिमुर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. किशोर देऊरकर, श्री.अमोद गौरकर तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपुर, श्रीरामे सर, श्री. उत्तम घुगरे, श्री. उध्दव लोखंडे, कु. सरुला भिवापुरे, श्री. रुपेश चौधरी, श्री. रुपेश केदार, श्री. संजय पाटील, श्री. समित जाधव, श्री. योगेश अंतमवाड, श्री. रामदास नैताम वनपाल गस्तपथक व त्यांची चमु, JFM सदस्य व PRT चमुसह इतर वनकर्मचारी कारवाही दरम्यान हजर होते.