एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन… — अरविंद वर्धेकर यांचा नवउपक्रम…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

         स्थानिक दर्यापूर येथील एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स मधील विद्यार्थ्यांना लोकशाही मतदानाविषयी माहिती शिक्षक अरविंद वर्धेकर सर यांनी विषद केली.   

           पाठ्यपुस्तकातील एका प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही मतदानाचे महत्त्व रॅली काढून करण्यात आले. लोकशाही निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते.

           आचारसंहिता,पात्र उमेदवार लोकशाही शासन प्रणाली मधून हक्काच्या उमेदवाराला प्रतिनिधी म्हणून निवडून देणे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अरविद सर यांनी केले.

             एकविरा स्कूल मधून विद्यार्थ्यांनी रॅली काढत मतदार बंधू भगिनींना मतदान जनजागृतिच्या घोषणा दिल्या भारतीय नागरिकाला वयाच्या 18 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावता येतो व लोकशाही शासन प्रणालीत स्वतःच्या मर्जीतील उमेदवाराला मतदान करण्याची संधी लोकशाहीने दिले आहे.

             यासह विविध विषयावर अरविंद वर्धेकर सर यांनी लोकजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन केले यावेळी प्राचार्या उज्वला गायकवाड मॅडम वैशाली ठाकरे मॅडम सह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी वृंद उपस्थित होते.