युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
गौरखेडा (चांदई )येथील राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा संचालित मिलिंद विद्यालयात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराजांच्या फोटोचे पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपूर येथील आरोग्यसेवक जुनघरे , विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिपक कावरे, प्रशांत वानखडे, वासुदेव भांडे, पुरणप्रकाश लव्हाळे,कु मनिषा गावंडे, अमोल बोबडे हे उपस्थित होते.
संत गाडगे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये गोरगरीब लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपल्या भजन आणि कीर्तनातून लोकांना सोप्या आणि सरळ भाषेतून प्रबोधन केले. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याची जाणीव करून दिली.
स्वच्छतेचे माणसाच्या जीवनात किती महत्त्व आहे हे पटवून दिले. म्हणून प्रत्येकाने गाडगेबाबांचा दशसूत्रीचा संदेश आत्मसात करावा.असे विचार मुख्याध्यापकांनी अध्यक्षिय भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरनप्रकाश लव्हाळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल बोबडे यांनी केले. कार्यक्रमसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत वानखडे, वासुदेव भांडे, दिपक कावरे, अमोल बोबडे ,पुरणप्रकाश लव्हाळे, दिपक रहाटे, संजय आठवले आनंद खंडारे ,गणेश अंभोरे, मुमताज पठाण व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.