तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
दखल न्यूज़ भारत
आज दिनांक 24/02/2023 रोज शुक्रवारला सिंदेवाहि येथील मुस्लिम समाज सिंदेवाही येथील विविध सामाजिक आणि सांस्कृतीक संघटनांच्या वतीने नगराध्यक्ष स्वप्नीलजी कावळे यांचा वाढदिवस जामा मस्ज़िद च्या सामोरिल प्रांगनात मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक रासुलखां पठान माजी अध्यक्ष मुस्लिम मास्क ट्रस्ट आणि युनुसभाई शेख़ नगरसेवक न. प. सिंदेवाही-लोंनवाही तथा अध्यक्ष निराश्रीत-निराधार लोकसेवा प्रकल्प सिंदेवाहि यांच्या प्रमुख उपस्थीतीत समाजाच्या वतीने “पुष्लगुच्छ देवून आणि मीठाई वाटून साजरा करण्यात आला.
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने विविध संघटनांच्या पदाधीकाऱ्यानी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या, यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने “सिंदेवाहि शहरातील प्रथम नागरिक” म्हणून काही “विशेष रूपाने प्रस्तावित मागन्याकडे श्री स्वप्नीलजी कावळे यांचे लक्ष वेधन्यात आले.
या वाढदिवसाच्या आनंदाच्या क्षणी प्रामुख्याने युनुसभाई हबीब शेख़ नगरसेवक, रसुलखा पठान ज्येष्ठ नागरिक मुस्लिम समाज, अटाउल्लाहखान पठान पदाधिकारी मुस्लिम मास्क ट्रस्ट, जहिदखांन पठान सामाजिक कार्यकर्ता, वहाबअली सैय्यद, ज्येष्ठ पत्रकार,अमान कुरैशी मीडिया रिपोर्टर, फिरोजखान सत्तारखांनं सामाजिक कार्यकर्ता, अलताफ खान पठान, इरफानअली प्यार सैय्यद, विट्ठल खोब्रागड़े, चिराग बांबोले, अष्पाक शेख, लतीफ शेख़, रियाजभाई शेख, जुनैद कुरैशी, अमित बिसेन, वासु आलेवार, इत्यादि मान्यवर उपस्थीत होते.