डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

       अल्लापली येथील श्री.संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्सहात पार पडली.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जयंती कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहून संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले.

      माजी जि.प.अध्यक्ष यांनी पुढे बोलतांना म्हणाले संत गाडगे महाराजांचं खरं नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होतं.त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावतीतल्या शेंडगाव इथं झाला.लहानपणीपासूनच जनजागृती करण्याचं गाडगे महाराजांनी ठरवलं होतं आणि त्यासाठी ते गावोगावी भटकत असत.

       डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी,एका कानात कवडी,तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू,दुसऱ्या हातात मडके असा वेश,तर गावोगावी जाऊन लोकांची गटारं साफ करुन त्यांना स्वच्छतेचं महत्व शिकवून, त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातनं त्या गावात शाळा किंवा हॉस्पिटलं बांधणारे संत गाडगे महाराज स्वातंत्र्यापूर्वीपासूनच जनजागृतीचं काम करत असत.

      विसाव्या शतकातल्या समाज सुधारणेसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये गाडगेबाबा यांचं कार्य महत्वाचं ठरतं.गाडगेबाबांनी अनेक गावं पालथी घातली. ज्या गावात जाऊन ते आधी साफ सफाई करायचे त्याच गावात गाडगेबाबा प्रवचन करत असत.आपल्या प्रवचनातनं गाडगेबाबांनी तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगितलं. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणाऱ्या गाडगेबाबांनी “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका” असं आपल्या प्रवचनातनं लोकांच्या मनावर बिबवलं.

      चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असं त्यांना आपल्या प्रवचनातनं सांगितलं. आपल्या आवडीसाठी प्राणी मारता मात्र त्याला देवाचं नाव देऊ नका असा स्पष्ट विचार गाडगेबाबांनी मांडला.

       देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

      महाराष्ट्र शासनानेही स्वच्छ गावांसाठी पुढाकार घेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना राबवली होती असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मोलाचे संत गाडगेबाबांचे विचार उपस्थितांना व्यक्त करुन सांगितले या संत गाडगेबाबा महाराजांचे विचार व्यक्त करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या डोळ्यात अश्रू दिसुन येत होते..!!

      यावेळी उपस्थित शंकर मेश्राम सरपंच आलापल्ली,सुरेश गड्डमवार त.मु.अध्यक्ष आलापल्ली,सौ. सुमनताई खोब्रागडे ग्रा.प.सदस्य आलापल्ली,मा.शारदाताई कळते ग्रा.प.सदस्य आलापल्ली,मा.सौ. सुगंदाताई मडावी ग्रा.प.सदस्य आलापल्ली,सौ.शकुंतलाताई दुर्गम ग्रा.प.सदस्य आलापल्ली,सौ.भाग्यश्रीताई बेझलवार ग्रा.प.सदस्य आलापल्ली,सौ.रजनीताई गंजीवावार ग्रा.प.सदस्य आलापल्ली,सौ.उषाताई आत्राम ग्रा.प.सदस्य आलापल्ली,मा.गुप्ता मॅडमसह आविसंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..!!

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com