दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत राजूरा तालुक्यातील मौजा कुसुंबी गावच्या आदिवासींच्या जमिनी हडपत असल्याचा,” पुराव्यानिशी दावा,वरोरा येथील नावाजलेले तलाठी विनोद खोब्रागडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे केला होता.
त्यांच्या दाव्या नुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगापुढे सुनावणी दरम्यान उपस्थित राहून बयान नोंदविण्यास नोटीसाद्वारे अनेकदा अवगत केले होते.
मात्र चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नोटीसांना मनावर घेतले नाही म्हणजेच जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले.परिणामतः त्यांच्या अटकेचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने काढले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अटकेचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात खळबळ उडाली आहे.
पण,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांना खरोखरच अटक होणार काय?हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.