शेखर इसापूरे,
विभागीय प्रतिनिधी, नागपूर
दखल न्यूज, भारत
यवतमाळ:-
मानवतावादी विचारातूनच क्रांती शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. अभीविलास नखाते यांनी नारिंगे नगर यवतमाळ येथील रायगडावरून बहाद्दर मावळ्यांच्या उपस्थितीत केली. येथील धामणगाव रोड स्थित रायगडावर शिवजन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नरेंद्र गद्रे यांनी भूषविले.
दि. १९ फेब्रुवारी रोजी बळीराजा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नरेंद्र गद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रायगड या नवनिर्मित वास्तूचे लोकार्पण व शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून सांगली येथील संयोजक बाळासाहेब रास्ते यांची उपस्थिती लाभली होती. तर प्रमूख पाहूणे म्हणून डॉ.महेंद्र धावडे, नागपूर, रणजीत ,ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे, विचारवंत संतोष अरसोड, शिवतिर्थ नागपूर संचालक अभिविलास नखाते, सौ. सुनीता अभिविलास नखाते, पुरुषोत्तम सोळंके अमरावती,किसन बिसवे पाटिल पुणे आदी. मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात बळीराजा पूजन, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बळीराजा स्वराज्य सेनेची प्रतिज्ञां सर्वांना देऊन झाली
…आपली भूमिका स्पष्ट करतांना नरेंद्र गद्रे यांनी,अन्नदाता सुखी भव अर्थात संपूर्ण क्रांती हे आमचे मिशन असून भारतीय संविधान आमची प्रेरणा आहे. बळीराजाला मानवतावादी विचाराने संघटीत करणे, सामर्थ्यवान बनविणे, प्रशिक्षित नेतृत्व तयार करणे,व बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व समृध्द करणे ही आमच्या विकासाची त्रीसुत्री असून जे सोबत आले त्यांच्यासोबत व जे नाही आले त्यांचेशिवाय आम्ही हे कार्य पूढे नेऊ, असा आमच्या संघटनेचा महासंकल्प असल्याने सांगितले.
.ग्रामगीताचार्य खुशाल ठाकरे यांनी आपले प्रबोधन करताना भारतीय संविधान हा पूज्यनीय ग्रंथ असून आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी या पवित्र ग्रंथानुसार आचरण करावे व समाजबुडव्या वृत्तीपासून सावध रहावे ,असा संदेश दिला.
क्रांतीकारी संत गाडगेबाबा या पुस्तकाचे लेखक संतोष अरसोड यांनी गाडगेबाबांनी जत्रेला ज्ञानयात्रेच स्वरूप देण्याचे कार्य केले आहे. हे कार्य पुढे नेताना प्रबोधनाचा वारसा वृद्धिंगत करण्यासोबतच रायगड हा परिवर्तनाचा विचारगड ठरावा अशी अपेक्षा केली.
महेंद्र धावडे यांनी, या कार्यात नरेंद्र गद्रेंचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी सेंद्रिय शेती करणारे यशस्वी शेतकरी विकास गर्जे,गांडुळखत शेतीचे प्रकल्पक प्रभाकर ठाकरे, शिवरायांची प्रतिमा शिल्प साकारणारे शिल्पकार प्रवीण पिल्लारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बळी खैरे, विकास शिंदे सांगली, अच्युत पूरी उस्मानाबाद, सौ. सुनीता व अभिविलास नखाते, नागपूर , बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रकाश ठाकरे यांचा हदय सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार मित्र कवडू नगराळे यांनी केले.सूत्रसंचालन गणेश राऊत, बाबासाहेब कपिले, जगताप मॅडम यांनी संयुक्तपणे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळीराजा जनकल्याण NGO चे सौ अनघा गद्रे,राजेश धोटे, भानुदास कानारकर, बाबा कपिले, किशोर गायधनी , संजय देशमुख , रंजनाताई गायकी , सुरेंद्र हटवार , अजय पुनसे आर्णी, नरेंद्र तराळे वणी, रहेमान शेकुवाले , अनील महाजन, सचिन त्रिवेदी, गजानन सूर्यवंशी आदींनी अथक परिश्रम केले.
इडा पिडा टळू दे… बळीचे राज्य येऊ दे…
जय भारत… जय संविधान… च्या घोषणेने कार्यक्रमाची समाप्ती झाली.