रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव-२०२५ चे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटक म्हणून प्रा.मारोतराव भोयर कोषाध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समिती हे होते. प्रत्येक विदयार्थ्यानी महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ स्तरावर खेळले पाहीजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अतिथी म्हणून डॉ.धनजंय गहाने प्राचार्य नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपूरी हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे तसेच स्वतःची बलस्थाने, संधी ओळखता आली पाहिजे.
क्रीडा स्पर्धेमुळे मन, बुद्धी, शरीर यांचा विकास होतो.अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले,ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, खेळामुळे पराभव पचवण्याची ताकद वाढते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व समर्पण,परिश्रम करण्याची तयारी ही निर्माण होते अरुणिमा सिन्हा व लई पाश्चर यांची विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक यावले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की गेली वीस वर्षापासून मैदानी खेळ कमी झाले आहे. मोबाईलचा अति वापर झाला आहे परिणामी विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटली आहे. मोबाईलचा वापर कमी करून जास्तीत जास्त मैदानी खेळ करावे खेळामुळे संघ भावना व शारीरिक , मानसिक सकारात्मक येईल असा आशावाद व्यक्त केला.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांनी अनेक खेळात सहभागी झाले पाहिजे. प्राविन्य प्राप्त केले पाहिजे.दरवर्षी अशा या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यात स्फूर्ती वाढेल. कार्यक्रमाला उपस्थित सचिव गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव प्रा. विनायकराव कापसे होते.
उपप्राचार्य डॉ.प्रफुल बनसोड,डॉ.कार्तिक पाटील, वार्षिक उत्सव 2025 चे प्रभारी डॉ.प्रफुल राजुरवाडे, प्रा. राकेश कुमरे,क्रीडा संचालक प्रा.दुर्योधन रोकडे मंचावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.नितिन क्रोजवार व आभार शारिरिक शिक्षण संचालक व क्रिडा महोत्सव प्रभारी डॉ. उदय मेंढूलकर यांनी केले. क्रीडा महोत्सवाची सुरुवात राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यानी गॉर्ड ऑफ ऑनरनी झाली.
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बॅड पथकासह मार्चपासचे सादरीकरण करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यानी उदंड प्रतिसाद दिला.