व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी व्येंकटेश दुडमवार तर सचिवपदी विलास ढोरे यांची निवड…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : जिल्हा व्हॉईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेचीची बैठक जेष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्कीट हाऊस, गडचिरोली येथे पार पडली.

            व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्या सोबत व्हिडिओ कॉम्फरन्स‌द्वारे संवाद साधल्या नंतर सदर बैठकीत सर्वानुमते व्येंकटेश दुडमवार यांची व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जिल्हा सचिवपदी विलास ढोरे यांची नियुक्ती करण्यात आली.

             सदर बैठकीला संजय तिपाले, सुमित पाकलवार, जयंत निमगडे, प्रा.मुनिश्वर बोरकर, चेतन गहाणे, मारोती भैसारे, कालीदास बन्सोड, आशिष अग्रवाल, फिरोज लालानी, रुषी सहारे, सुरज हजारे, सुनिल नंदनवार, हितेश ठेंगे, नितीन ठाकरे, सोमनाथ उईके, मिलिंद खोंड, तिलोतमा हाजरा, कृष्णा वाघाडे, शेषराज संगिडवार, आनंद विश्वास, तेजश गुज्जलवार, शरीफ कुरेशी, राहुल अंबादे आदी सहीत जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

             येत्या काळात तालुका अध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार आहे.